शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसशी सहमतीसाठी केसीआर अनुकूल? पडद्याआडून हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 05:34 IST

निवडणूक निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकारस्थापनेसाठी काँग्रेसला सहकार्य करण्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) अनुकूल दिसत आहेत.

नवी दिल्ली : निवडणूक निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकारस्थापनेसाठी काँग्रेसला सहकार्य करण्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) अनुकूल दिसत आहेत. त्यांनी तशा हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येते.तेलंगणात मतदान झाल्यानंतर केसीआर यांनी एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची भेट घेऊन निवडणुकीनंतर निर्माण होऊ शकणाऱ्या स्थितीवर चर्चा केली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अशी बैठक झाल्याचे मान्य केले. लोकसभा निवडणुकांत या दोन पक्षांची आघाडी नसली तरी निवडणुकांनंतर परिस्थिती पालटू शकते, असे सूचक विधान तेलंगणा राष्ट्र समितीच्या सूत्रांनी केले आहे.भाजप व काँग्रेसला दूर ठेवून लोकसभा निवडणुका निकालानंतर प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी केसीआर प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. पण आता ते काँग्रेसशीही सहकार्य करण्यास तयार आहेत. मात्र त्यांनी अद्याप तशी अधिकृत घोषणा केलेली नाही.लोकसभा निवडणुकांत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला. पण तेलंगणा राष्ट्र समितीने त्यापासून दूर राहिली होती.जगनमोहनशी संपर्कआपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केल्यानंतर त्यांचे राजकीय शत्रू केसीआर काहीसे सुखावले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले. नायडूंचे विरोधक असलेल्या वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्याशीही केसीआर यांनी संधान बांधले आहे.

टॅग्स :marathiमराठीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक