शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:04 IST

Katra-Srinagar Vande Bharat Train: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये दोन प्रशिक्षित कमांडो तैनात असतील.

Katra-Srinagar Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. या एक्सप्रेस ट्रेनमुळे कटरा ते श्रीनगर हे अंतर फक्त ३ तासांवर आले आहे. पूर्वी रस्त्याने जाण्यासाठी ६-७ तास लागायचे. 

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कमांडोतैनावंदे भारत ट्रेन सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला देशाच्या उर्वरित भागाशी जोडण्याचा मार्ग सोपा झाला आहे. पण, या भागातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता, विशेषतः २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी विशेष प्रशिक्षित कमांडो तैनात करण्यात आले आहेत. 

प्रत्येक कोचमध्ये दोन कमांडो तैनात करण्यात आले असून, ते अत्याधुनिक शस्त्रे, बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट आणि इतर हाय-टेक गॅझेट्सने सुसज्ज आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये सुरक्षेचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना काश्मीर खोऱ्यात प्रवास करताना कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही.

सुरक्षा दलांचा संयुक्त सराव१६ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीर पोलिस आणि रेल्वे संरक्षण दलासोबत NSG ने कटरा रेल्वे स्थानकावर ट्रेन इंटरव्हेंशन सराव केला. या सरावाचे उद्दिष्ट दहशतवादी धोक्यांना तोंड देण्यासाठी सुरक्षा दलांमध्ये समन्वय आणि तयारी वाढवणे होते. एनएसजीच्या या उपक्रमामुळे रेल्वे आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने संभाव्य दहशतवादी कारवाया रोखण्यासाठीची रणनीती अधिक मजबूत झाली आहे.

ट्रेनमध्ये हाय-टेक सुविधारेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही ट्रेन -२० अंश सेल्सिअस पर्यंत तापमानासारख्या हिमालयातील कठीण परिस्थितीतही सुरळीत चालण्यासाठी डिझाइन केलेली आहे. यात स्वयंचलित दरवाजे हीटिंग सिस्टम आणि अँटी-स्पॉल लेयर सारख्या उच्च तंत्रज्ञानाच्या सुविधा आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने, ट्रेनमध्ये प्रवाशांची तपासणी आणि इतर सुरक्षा प्रोटोकॉल देखील लागू करण्यात आले आहेत.

प्रमुख स्थानकांवर विशेष सुरक्षा रेल्वे बोर्डाने कटरा, रियासी, सांगलदान, बनिहाल, काझीगुंड, अनंतनाग आणि श्रीनगर सारख्या प्रमुख स्थानकांवर विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. ही ट्रेन केवळ कनेक्टिव्हिटीला चालना देणार नाही तर पर्यटन आणि व्यवसायालाही प्रोत्साहन देईल.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला