शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

Kathua Rape Case : कठुआ बलात्कार अन् हत्याप्रकरणी तीन दोषींना जन्मठेप, तर तिघांना तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 17:33 IST

आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने चालू होती.

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांना सोमवारी पठाणकोट सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये सांजी राम, दीपक खुजारिया आणि परवेश कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर तिलक राज, आनंद दत्ता और सुरेंद्र कुमार यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. 

आज सकाळी सत्र न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले. विशेष न्यायालयाने सहापैकी तिघांना बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले. अन्य तिघांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांत दोषी ठरवले. सांजी राम, परवेश कुमार, दीपक खजुरिया यांना 302 (हत्या), 376 (बलात्कार), 120 ब (कट रचणे), 363(अपहरण) या कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले. पोलीस कर्मचारी आनंद दत्ता, सुरेंद्र कुमार, तिलक राज यांना 201 (पुरावे नष्ट करणे) या कलमांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली. 

कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला काही महिन्यांपूर्वी ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपींमध्ये सांजी राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्सटेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांचा समावेश आहे. त्यांच्याविरूद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारवर अनेक कलम लावण्यात आली आहेत. या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने चालू होती.

मुस्लीम समाजातील बकरवाल (मेंढ्या व घोडे पाळणारे) या भटक्या जमातीच्या बालिकेचे आठ वर्षे वयाच्या 10 जानेवारी रोजी अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी  अत्याचारानंतर तिची हत्या केली. 17 जानेवारीला जंगलात चिमुकलीचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली होती. 

पीडितेच्या वकिलांना वारंवार धमकावण्यात येत होते. त्यामुळे हे  प्रकरण जम्मू काश्मीर राज्याबाहेरच्या न्यायालयात चालवण्यात यावं अशी याचिका पीडित कुटुंबियांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. आठ वर्षाच्या पीडित मुलीला न्याय देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकील दीपिका सिंह राजवंत यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दीपिका यांनी तशी भीती बोलून दाखवली. माझ्या जीवाला धोका असून माझ्यावर बलात्कार केला जाऊ शकतो, असे दीपिका सिंह यांनी  एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. एका चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी मी ही लढाई लढत आहे. मात्र, हा खटला घेतल्यापासून अप्रत्यक्ष माझ्यावर सर्वांनी

बहिष्कारच घातला आहे. त्यामुळे या लढाईत मी किती दिवस टिकेन माहीत नाही, असे अशी हतबलता दीपिका सिंह यांनी व्यक्त केली होती. माझ्यासोबत काहीही होऊ शकते. माझ्यावर बलात्कार होऊ शकतो. माझी हत्या केली जाऊ शकते किंवा माझी कोर्टातील प्रॅक्टिस थांबवली जाऊ शकते. सध्या मी अत्यंत भयंकर परिस्थितीतून जातेय. मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केल्याचंही त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणJammu Kashmirजम्मू-काश्मीरCourtन्यायालय