शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kathua Case: कठुआच्या लेकीसाठी लढणाऱ्या अ‍ॅड. दीपिका राजावत आहेत तरी कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 15:54 IST

कठुआच्या लेकीवरील अमानुष अत्याचार, निर्घृण हत्येचं प्रकरण उघडकीस आलं आणि एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे अ‍ॅड. दीपिका सिंह राजावत यांचं. धमक्या, दबाव सारं काही सहन करत, प्रसंगांना सामोरं जात त्यांनी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवली ती एकाच निर्धारानं.

कठुआच्या लेकीवरील अमानुष अत्याचार, निर्घृण हत्येचं प्रकरण उघडकीस आलं आणि एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे अ‍ॅड. दीपिका सिंह राजावत यांचं. धमक्या, दबाव सारं काही सहन करत, प्रसंगांना सामोरं जात त्यांनी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवली ती एकाच निर्धारानं...कठुआच्या लेकीला न्याय मिळवून द्यायचाच! जम्मूच्या दीपिका सिंह राजावत. पेशानं वकील, सामाजिक कार्यात सुद्धा सक्रिय असतात. वॉइस फॉर राइट्स नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मुलं आणि महिलांसाठी दीपिका लढत असतात.पाच वर्षांच्या मुलीची आई असलेल्या दीपिकाने कठुआच्या लेकीसाठी लढणं हे स्वाभाविकच ठरलं. याआधीही त्या अशा सामाजिक अन्याय-अत्याचारांच्या प्रकरणात मैदानात उतरल्या. कायदेशीर लढाईही लढल्या. एक बारा वर्षांची मोलकरीण मुलगी गायब झाली होती. दीपिका तिच्यासाठी पुढे सरसावल्या. न्यायालयातही गेल्या. धक्का बसेल मात्र त्यावेळी त्यांना जम्मू बार असोसिएशनने निलंबित केलं होतं. न्यायासाठी लढल्याचा 2012मध्ये बसलेला फटका दीपिका विसरू शकत नाहीत. मात्र त्याचवेळी आपलं कर्तव्यही! त्यामुळेच जेव्हा कठुआच्या लेकीचं प्रकरण पुढे आलं तेव्हा त्या स्वत: पीडित कुटुंबाला भेटल्या. त्यांच्या लेकीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली.अर्थात इतर प्रकरणं आणि हे प्रकरण यात मोठा फरक. दीपिका राजावत वकील म्हणून लढतायत त्याचं कौतुक नाहीच पण त्यांना धमक्या आल्या. त्या शेवटी बोलल्याही, "मला बलात्काराच्या, ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. मला ठाऊक नाही मी जम्मूत कसं जगू शकेन. मला कदाचित न्यायालयात प्रॅक्टिसही करू देणार नाहीत. एका चिमुरड्या मुलीवर अमानुष अत्याचार होतात आणि तिला न्याय मिळवून देण्यातच अडथळे आणले जातात. यांना माणसं म्हणायचं तरी कसं?"एकीकडे धमक्या, तर दुसरीकडे जगभरातून कौतुकही. त्यांचं एक छायाचित्र सध्या जगभर व्हायरल होतंय. अ‍ॅड. दीपिका सिंह राजावत...आत्मविश्वासानं परिपूर्ण...ठामपणे चालत...पुढे येत आहेत...आणि तिच्या सभोवतालचे पुरुष कुतूहलाने पाहत आहेत. प्रतिकूलतेशी सामना देत कमावलेला आत्मविश्वास असतोच तसा...साऱ्या विरोधाला पुरून उरत साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा! 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरण