शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

"काश्मिरातील तरुणांच्या वाट्याला संघर्षमय आयुष्य येणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 11:14 IST

पंतप्रधानांचे आश्वासन, २० हजार काेटींच्या याेजनांचे उद्घाटन

सांबा : तुमचे आई-वडील आणि आजी-आजाेबांच्या वाट्याला आलेले संघर्षमय आयुष्य तुम्हाला जगावे लागणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काश्मीर खाेऱ्यातील युवकांना दिले. कलम ३७० हटविल्यानंतर पंतप्रधान माेदींनी प्रथमच जम्मू आणि काश्मीरचा दाैरा केला. पंचायत दिनानिमित्ताने आयाेजित कार्यक्रमात त्यांनी सुमारे २० हजार काेटी रुपयांच्या विविध याेजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. त्यात बनिहाल-काजीगुंड भुयारी मार्गाचाही समावेश आहे. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनाेज सिन्हा उपस्थित हाेते.

माेदींनी यावेळी जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात शांतता नांदण्यासाठी तसेच विकासासाठी उचलण्यात आलेल्या विविध उपक्रमांना अधाेरेखित केले. तरुणांना उद्देशून त्यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये विकास गतीशील करण्यासाठी अनेक याेजनांची वेगाने अंमलबजावणी हाेत आहे. यामुळे या भागातील तरुणांना राेजगाराच्या संधी मिळतील. तुमचे आई-वडील आणि आजी-आजाेबा अतिशय संघर्षमय जीवन जगले. मात्र, तुम्हाला असा संघर्ष करावा लागणार नाही, असे मी तुम्हाला आश्वासन देताे. 

पल्ली गावाला बहुमान सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्रामपंचायतीने देशातील प्रथम शून्य कार्बन डायऑक्सायईड उत्सर्जन करणारी पहिली ग्रामपंचायत बनण्याचा बहुमान मिळविला. या ठिकाणी ५०० किलाेवॉट क्षमतेच्या साैरऊर्जा निर्मिती केंद्राचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. 

या याेजनांचे केले उद्घाटनबनिहाल-काजीगुंड भुयारी मार्गाचे नरेंद्र माेदींनी उद्घाटन केले. यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये बाराही महिने रस्ते वाहतूक सुरू राहणार आहे. याशिवाय दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचाही माेदींनी शुभारंभ केला. यासाठी सुमारे ७,५०० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. चिनाब नदीवर उभारण्यात येणाऱ्या ८५० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचेही माेदींनी भूमिपूजन केले. तसेच परिसरातील नागरिकांना स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी १०० औषध केंद्रांचेही माेदींनी उद्घाटन केले.

देशभरातील ३२२ पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या खात्यात ४४.७ काेटी रुपयांचे वाटप डिजिटल माध्यमातून केले. पाच लाखांपासून ५० लाख रुपयांपर्यंत पुरस्कारांची रक्कम आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी