शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

नव्या उपायांनी काश्मीर पुन्हा नंदनवन होईल; पंतप्रधान मोदींची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:16 IST

एकजुटीने साथ देण्याचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली : राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये असलेला विशेष दर्जा रद्द करणे व राज्याऐवजी केंद्रशासित प्रदेश करणे या नव्या उपायांमुळे फुटीरवाद व दहशतवादाचा निर्णायकपणे बीमोड करून जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा नंदनवन होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली. हे दोन्ही निर्णय काश्मीरच्या हितासाठीच घेण्यात आले आहेत व देशाचा मुकुटमणी असलेल्या या प्रदेशाला पुन्हा एकदा शांत, सुरक्षित व समृद्ध होण्यासाठी हरसंभव मदत करणे हे प्रत्येक देशवासीयाचे कर्तव्य आहे, असे सांगून या खडतर काळात काश्मीरला एकजुटीने साथ देण्याचे आवाहन केले.काश्मीरबाबतच्या निर्णयानंतर मोदींनी प्रथमच ‘दूरदर्शन’वरून देशाला उद्देशून भाषण केले. त्यांनी हे निर्णय का घेतले याचे विवेचन केले व नव्या व्यवस्थेने घडी व्यवस्थित बसली की जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन दिले. लडाख मात्र त्याहून वेगळे व केंद्रशासित प्रदेशच राहील, हेदेखील स्पष्ट केले.कामगार, कर्मचारी, विद्यार्थी, महिला, आदिवासी व अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी केलेल्या सर्व कायद्यांचा लाभ होऊन काश्मीर पुन्हा एकदा विकासाची घोडदौड सुरू करेल. याला वेग देण्यासाठी केंद्र सरकार विशेष मदत करेल. स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील सर्व रिक्त पदे लगेच भरली जातील, सैन्य आणि पोलीस भरतीसाठी शिबिरे घेतली जातील आणि काश्मीरमध्ये व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी सार्वजनिक तसेच खासगी उद्योगांनाही प्रोत्साहित केले जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. चित्रपट उद्योगानेही या कामी पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.मोदी म्हणाले की, अनुच्छेद ३७० व ३५ ए मुळे काश्मीरला लाभ होण्याऐवजी याचा फायदा घेऊन काही स्वार्थी मंडळींनी तेथील जनमानसात वेगळेपणाची भावना जाणीवपूर्वक निर्माण केली होती. याच भावनेचा शस्त्रासारखा वापर करून पाकिस्तानने तेथे दहशतवादाची बीजे पेरली. पण आता हे सर्व इतिहासजमा होऊन तेथे नव्या युगाची सुरुवात होईल. इतर सर्व देशवासीयांच्या साथीने काश्मीर या संधीचे नक्कीच सोने करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही नवी व्यवस्था पचनी पडेपर्यंत काश्मीरमध्ये सध्या काही खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. काही मूठभर लोक सोडले तर तेथील जनता यास धीराने तोंड देत आहे. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असेही त्यांनी सांगितले.लवकरच निवडणुकामोदींनी जाहीर केले की, पारदर्शी वातावरणात काश्मीर विधानसभेची निवडणूक लवकरच घेतली जाईल. इतकी वर्षे सत्तेची सूत्रे काही मोजक्या घराण्यांच्या हाती राहिल्याने नवे नेतृत्त्व उदयास आले नव्हते. पण आता नव्या काश्मीरचे नवे आणि समर्थ नेतृत्व तेथील नव्या पिढीतून उदयास येईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370