शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरात 1990 सारखी परिस्थिती; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 21:37 IST

Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनेनंतर आज काश्मिरी पंडितांची बैठक पार पडली. यात काश्मीर सोडून जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Kashmiri Pandit Target Killing: काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. या घटनांमुळे तिथे राहणारे हिंदू भयभीत झाले असून, आता सामूहिक पलायनाच्या तयारीत आहेत. गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँकेत घुसून व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनांनंतर आता काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पलायन करण्याची घोषणा केली आहे. उद्या(3 जून) काश्मिरी पंडित खोऱ्यातून एकत्र स्थलांतर करणार आहेत.

गुरुवारी बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काश्मिरी पंडितांनी ठरवले आहे की, ज्या भागात काश्मिरी पंडित आंदोलन करत होते, ते त्वरित बंद करण्यात येईल. काश्मीरमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांकांसमोर आता दुसरा पर्याय उरला नसल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत सर्व लोकांना बनिहालच्या नवयुग बोगद्याजवळ एकत्र येण्यास सांगण्यात आले आहे.

22 दिवसांपासून निदर्शने सुरू काश्मीरमधील अनंतनाग येथील सुरक्षा शिबिरात राहणारे आंदोलक रंजन झुत्शी म्हणाले की, गेल्या 22 दिवसांपासून सर्वजण आंदोलन करत आहेत. आम्हाला येथून सुखरूप बाहेर काढावे, अशी आमची मागणी आहे. आज विजय कुमार आणि परवा रजनी बाला यांची निर्घृण हत्या झाली. ज्या दिवशी राहुल भट्ट यांची हत्या झाली, त्या दिवशी आम्ही सांगितले होते की, आम्हाला येथून सुखरूप बाहेर काढा. जसे आम्ही 1990 मध्ये स्थलांतरित झालो होतो, त्याप्रकारे आताही जावे लागत आहे. सुमारे 3000 कर्मचारी आधीच जम्मूमध्ये पोहोचले आहेत. 

अमित शहा उद्या महत्त्वाची बैठक घेणार गृहमंत्री अमित शाह उद्या (3 जून) उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपारी होणाऱ्या या बैठकीत एनएसए अजित डोवालही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख पंकज सिंग हेही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला