शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आयुर्मान घटले, दोन वर्षांत 360 दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 17:24 IST

भारतीय लष्कराने राबवलेल्या आक्रमक मोहिमांमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याच्या मार्गावर आहे. लष्कराच्या आक्रमक पवित्र्यामुळे खोऱ्यातील दहशतवाद्यांचे  आयुर्मान घटले...

नवी दिल्ली -  भारतीय लष्कराने राबवलेल्या आक्रमक मोहिमांमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याच्या मार्गावर आहे. लष्कराच्या आक्रमक पवित्र्यामुळे खोऱ्यातील दहशतवाद्यांचे  आयुर्मान घटले असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे 360 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल राजीव राज भटनागर यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. काश्मीर खोऱ्यातील तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण हे चिंतेचा विषय आहे का, असे विचारले असता उत्तरदाखल भटनागर म्हणाले की, दहशतवादी संघटनांमध्ये भरती होणाऱ्या तरुणांचे वय कमी आहे. मात्र ते फार काळ जगू शकत नाहीत. त्यांची संख्या जास्त असू शकते पण त्यांचा परिणाम मर्यादित आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी संघटनांध्ये भरती होणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. मात्र सुरक्षा दलांकडून अशा तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये काही बाहेरच्या दहशतवाद्यांचा तर काही स्थानिक तरुणांचा समावेश आहे." राज्यातील सीआरपीएफचे जवान, राज्य पोलीस आणि लष्कर एकमेकांशी ताळमेळ ठेवून काश्मीरमध्ये काम करत असल्याचेही भटनागर यांनी यावेळी सांगितले. " आम्ही एक युनिट म्हणून काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळत आहे. यावर्षी आतापर्यंत 142 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. तर गतवर्षी 220 दहशतवादी मारले गेले होते." असे ते म्हणाले. काश्मीरमध्ये तैनात जवानांच्या सुरक्षेसाठी फूल बॉडी प्रोटेक्टर, बुलेट प्रूफ गाड्या आणि विशेष चिलखती वाहने तैनात करून जवानांच्या सुरक्षेचा स्तर वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी