शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 18:40 IST

काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर - नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे.  काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबादच्या जंगलात लष्कर आणि लपून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये आज चकमक उडाली होती. दरम्यान ही चकमक अद्याप सुरू असून, अजून एक दहशतवादी लपून बसलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

रफियाबादच्या जंगलात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने परिसराला घेराव घातला. तसेच शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने बेछुट गोळीबार करण्यास सुरुवात केली. लष्कराकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. ज्यात चार दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी नियंत्रण रेषा पार करून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान, या कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील भागात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर बारामुल्ला- उरी रोडवर एका दहशतवाद्याला ग्रेनेडसह अटक करण्यात आली आहे.  

दरम्यान, पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी मंगळवारी हाणून पाडला होता. जवानांच्या या धाडसी कारवाईत मंगळवारी पहाटे चार अतिरेकी ठार झाले होते, या मोहीमेदरम्यान मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्यही ही कारवाई मध्यरात्री सुरू झाली होती.कौस्तुभ राणे हे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांच्याखेरीज हवालदार जमी सिंग, हवालदार विक्रमजीत व रायफलमॅन मनदीप हेही या कारवाईमध्ये हुतात्मा झाले आहेत. कौस्तुभ राणेंबरोबरच हे तिघेही लष्कराच्या ३६ राष्ट्रीय रायफल्सचा भाग होते.

 

टॅग्स :Kaustubh Raneकौस्तुभ राणेंJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान