शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

ऋषी काश्यप यांच्या नावावरूनच काश्मीर असं नाव पडलं असेल; अमित शाह यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:51 IST

Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात काश्मीरच्या नावाबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात काश्मीरच्या नावाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. काश्मीरला ऋषी काश्यप यांची भूमी म्हणूनही ओळखलं जातं. कदाचित काश्यप यांच्या नावावरूनच या प्रदेशाचं काश्मीर असं नाव झालं असेल , असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होतं. सूफी, बौद्ध आणि शैल मठ सर्वांनी काश्मीरमध्ये चांगल्या पद्धतीने विकास केला आहे.

त्यांनी सांगितले की, कलम ३७० आणि ३५ए देशाला एक होण्यापासून रोखण्याच्या तरतुदी होत्या. संविधानसभेत या कलमांना बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे ही कलमं तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर या कलंकित अध्यायाला मोदी सरकारने हटवलं आणि विकासाचे रस्ते उघडले. 

अमित शाह पुढे म्हणाले की, कमल ३७० नेच काश्मीरमधील तरुणांमध्ये फुटीरतावादाची बिजे रोवली. कलम ३७० ने भारत आणि काश्मीरमधील एकोप्याला तोडलं. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद बोकाळला. मात्र आता कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी कारवाया घटल्या आहेत. 

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील असेही अमित शाह यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी सांगितले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. त्याला वेगळं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता. मात्र तो अडथळाही आता हटवण्यात आला आहे. काश्मीरमध्ये जी मंदिरं मिळाली आहेत, त्यांचा उल्लेख पुस्तकामध्ये आहे, त्यामधून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दर्शवते. लडाखमध्ये तोडण्यात आलेली मंदिरं, काश्मीरमध्ये संस्कृत भाषेचा होत असलेला वापर, काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर झालेल्या चुका या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकार