शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 13:38 IST

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. 

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (27 जुलै) चकमक झाली. या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बोनाबाजार येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक उडाली होती. या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरी आणि त्याच्या एका साथीदाराचा खात्मा करण्यात आला आहे. 19 वर्षीय मुन्ना हा पाकिस्तानचा रहिवासी असून आयईडी तयार करण्यात एक्सपर्ट होता. शोपियान जिल्ह्यातील बोनाबाजार येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. 

आज पहाटे दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील बोनाबाजार येथे दोन ते दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या जवानांनी परिसराला घेराव घातला. हे दहशतवादी एका घरात लपून बसले होते. त्यांनी जवानांना पाहिल्यानंतर त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन्ही दहशतवादी ठार झाले. या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरावर नजर ठेवली आहे. तसेच परिसरातील इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. 

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या वाँटेड दहशतवाद्याला काही दिवसांपूर्वी श्रीनगरमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.  दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली होती. बसीर अहमद असं दहशतवाद्याचं नाव असून त्याच्यावर तब्बल 2 लाखांचं बक्षिस होतं. मिळालेल्या माहितीनुसार, बसीर अहमद याला श्रीनगरमधून अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले. बसीरवर दोन लाखांचे बक्षीस होते. तो अनेक दिवसांपासून फरार होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला त्याच्या विषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याला ट्रॅक करायला सुरुवात केली. याआधी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचे साथीदार फैयाज आणि मजीद बाबाला अटक केली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदterroristदहशतवादी