नवी दिल्ली, दि. 25 - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची 1.16 कोटींची संपत्ती जप्त केली असून, बँक अकाऊंट आणि एफडीही गोठवली आहेत. विशेष म्हणजे 90 लाख रुपयांची एफडी कार्ती चिदंबरम यांची बँकेत जमा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, छाप्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती मोठं यश लागलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहेत. न्यायालयानंही कार्ती चिदंबरम यांना या प्रकरणात फटकारलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचार आणि हवालाच्या माध्यमातून पैसे जमवल्याच्या आरोपात अडकलेले कार्ती चिदंबरम यांना चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर होण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मद्रास उच्च न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांच्याविरोधातील लूकआऊट नोटीसवर स्थगिती आणत त्यांना परदेशी प्रवास करण्याची परवानगी दिली होती. 16 ऑगस्ट रोजी कार्ती चिदंबरम परदेशी प्रवास करणार होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कार्ती चिदंबरम देश सोडून जाऊ शकणार नाहीत.
एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त, सक्तवसुली संचालनालयाची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 15:26 IST
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त केली असून, बँक अकाऊंट आणि एफडीही गोठवली आहे.
एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त, सक्तवसुली संचालनालयाची मोठी कारवाई
ठळक मुद्देमाजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त केली असून, बँक अकाऊंट आणि एफडीही गोठवली आहेत.90 लाख रुपयांची एफडी कार्ती चिदंबरम यांची बँकेत जमा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, छाप्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती मोठं यश लागलं आहे.