शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोहरी रंग लाई! 74 वर्षांनी भेटले दोन ‘सगे भाई’; करतारपूर कॉरिडॉरने दिले भावाच्या नात्याला नवे परिमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 08:09 IST

दोन्ही भावांमधील प्रेम पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. दोन्ही भावांच्या भेटीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

- बलवंत तक्षकनवी दिल्ली : भारत- पाकिस्तान फाळणीदरम्यान वेगळे झालेल्या मोठ्या भावाची कधी भेट होईल, असे लुधियानाच्या हबीब यांना स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, ही भेट प्रत्यक्षात साकार झाली तेव्हा या भावांनी गळाभेट घेत अश्रुंना वाट करुन दिली. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील फुल्लांवाला गावात राहणारे हबीब यांचे स्वप्न ७४ वर्षांनंतर जेव्हा पूर्ण झाले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांच्यापासून वेगळे झालेले भाऊ मुहम्मद सिद्दीकी (८०) हे त्यांना करतारपूर कॉरिडॉरमध्ये भेटले तेव्हा गळाभेट घेत या भावांनी आनंदाश्रुंना वाट करुन दिली.

दोन्ही भावांमधील प्रेम पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले. दोन्ही भावांच्या भेटीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. भारतातून मोठ्या संख्येने शीख भाविक दरवर्षी करतारपूरला जातात. करतारपूर कॉरिडॉरमध्ये गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ७३ वर्षांनंतर अचानक दोन मित्रांची भेट झाली होती. 

अविस्मरणीय भेटी 

  • भारतातील सरदार गोपाल सिंह (९४) आणि पाकिस्तानातील मुहम्मद बशीर (९१) यांची भेट अशीच अविस्मरणीय ठरली होती. 
  • यापूर्वी २०१९ मध्ये करतारपूर कॉरिडॉरमध्ये दोन भाऊ भेटले होते. 
  • भारतात राहणारे दलबीर सिंह आणि त्यांचे चुलत भाऊ अमीर सिंह यांची भेट झाली होती.
टॅग्स :Punjabपंजाब