शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'पद्मावत'मध्ये राजपूतांच्या शौर्याचं दर्शन, सिनेमाला विरोध करणार नाही - करणी सेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 13:24 IST

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या सिनेमाला आता राजपूत करणी सेना विरोध करणार नाही.

नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला आता राजपूत करणी सेना आता विरोध करणार नाही. सिनेमामध्ये राजपूतांचं शौर्य दाखवण्यात आले आहे, यामुळेच आता सिनेमाला विरोध न करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला आहे. करणी सेनेनं याबाबतची घोषणा शुक्रवारी (2 फेब्रुवारी) केली आहे. राष्ट्रीय राजपूर करणी सेनेचे नेते योगेंद्र सिंह कटार यांनी सांगितले की, सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह यांच्या आदेशानुसार सिनेमाला विरोध न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

करणी सेनेतील काही सदस्यांनी मुंबईमध्ये शुक्रवारी पद्मावत सिनेमा पाहिला. सिनेमामध्ये राजपूतांनी दिलेले बलिदान व त्यांच्या शौर्याचं वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राजपूताला अभिमान वाटले, असा हा सिनेमा आहे, अशी प्रतिक्रिया करणी सेनेनं सिनेमा पाहिल्यानंतर दिली. सिनेमामध्ये दिल्लीतील सुलतान अलाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यादरम्यान कोणतेही आक्षेपार्ह असे दृश्य चित्रित करण्यात आलेले नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन करणी सेनेनं सिनेमाला विरोध न करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर 'पद्मावत' राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यासाठी प्रयत्न करणी सेना करणार आहे, असेही योगेंद्र सिंह यांनी सांगितले.  

दरम्यान, पद्मावत सिनेमाच्या शुटिंगपासूनच करणी सेनेनं तीव्र निदर्शनं करण्यास सुरुवात केली होती. जयपूरमध्ये सिनेमांचं शुटिंग सुरू असताना दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यावर करणी सेनेनं हल्ला केला होता. यानंतर सेटवर जाळपोळ व तोडफोडदेखील करण्यात आली होती. शिवाय, सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणण्यासाठी हिंसक आंदोलनंदेखील करण्यात आली होती. हिंसाचार आणखी उफाळून नये, यासाठी खबरदारी म्हणून चार राज्यांमध्ये सिनेमा रिलीजदेखील करण्यात आलेला नाही.   

टॅग्स :Padmavatपद्मावतKarni Senaकरणी सेनाSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळी