शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lokendra Singh Kalvi : करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन, SMS हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 09:45 IST

Lokendra Singh Kalvi : करणी सेनेची स्थापना करणारे लोकेंद्र सिंह कालवी अनेक वर्षांपासून आपल्या समाजाच्या हितसंबंध आणि मागण्यांबाबत सक्रिय होते.

जयपूर : करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एसएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधी लोकेंद्र सिंह कालवी हे ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी होते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. लोकेंद्र सिंह कालवी यांच्यावर नागौर जिल्ह्यातील कालवी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकेंद्र सिंह कालवी यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. जून 2022 पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. करणी सेनेची स्थापना करणारे लोकेंद्र सिंह कालवी अनेक वर्षांपासून आपल्या समाजाच्या हितसंबंध आणि मागण्यांबाबत सक्रिय होते. तसेच, लोकेंद्र सिंह कालवी हे अनेक प्रकरणांमुळे चर्चेत राहिले. विशेषत: राजपूत समाजाच्या अभिमानाबद्दल ते अतिशय सजग होते. दरम्यान, लोकेंद्र सिंह कालवी यांचे वडील कल्याण सिंह कालवी हे देखील काही काळ राज्य आणि केंद्रात मंत्री होते.

लोकेंद्र सिंह कालवी यांनीही निवडणूक लढवली होतीलोकेंद्र सिंह कालवी हे सामाजिक प्रश्नांसोबतच राजकारणातही सक्रिय होते. त्यांनी नागौरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 1998 मध्ये त्यांनी बाडमेरमधून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, पण यावेळीही त्यांचा पराभव झाला. 2003 मध्ये, त्यांनी इतर काही लोकांसह एक सामाजिक व्यासपीठ तयार केले आणि आरक्षणाची मागणी करणारी मोहीम सुरू केली होती.

वडील होते मंत्रीलोकेंद्र सिंह कालवी यांना राजकारणाचा वारसा लाभला होता. त्यांचे वडील कल्याण सिंह कालवी हे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तसेच, ते चंद्रशेखर यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक होते, असे म्हटले जाते. लोकेंद्र सिंह कालवी यांनी अजमेरच्या मये कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान