शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचा फॉर्म्युला भाजपाला 'या' चार राज्यांमध्ये भोवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 19:47 IST

भाजपा आणि मित्रपक्षांच्या चार राज्यांमधील सत्तेला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई - सर्वात जास्त आमदार असलेल्या पक्षाला सरकारस्थापनेसाठी पाचारण करण्याचे कर्नाटकातील राज्यपाल वजुभाई वाला यांचे धोरण भाजपला तेथे सत्तादायी ठरले आहे.  मात्र तेथे फायद्याचे ठरलेले धोरण आता देशातील तीन राज्यांमध्ये भोवण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या राज्यपालांनी जे केले तुम्हीही करा, त्याच न्यायाने राज्याच्या विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापन करण्याची संधी द्या, अशी मागणी गोवा, बिहार, मणिपूर, मेघालय या चार राज्यांमधील विरोधी पक्षांनी तेथील राज्यपालांकडे केली आहे.  त्यामुळे भाजपा आणि मित्रपक्षांच्या चार राज्यांमधील सत्तेला धोका निर्माण झाला आहे.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्या पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी २४३ सदस्यांच्या विधानसभेत ८० आमदार असल्याने आपल्याला सत्तास्थापनेची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या सहकार्याने तेथे बहुमत सिद्ध करण्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यपालांनी शुक्रवारी दुपारी एक वाजता त्यांना भेटीसाठी वेळ दिली आहे. सध्या तेथे भाजपाच्या पाठिंब्यावर नितिशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त)चे सरकार आहे.

गोव्यात तर काँग्रेसच्या तोंडाशी असलेला घास भाजपाने हिरावून घेतला होता. काँग्रेसच्या गोव्याच्या प्रभारी चेल्लाकुमार शुक्रवारी त्या राज्यात पोहचत असून राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी संधी देण्याची मागणी करणार आहेत.

मणिपूरमध्येही अशीच राजकीय हालचाल सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंह यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची मागणी केली आहे. मेघालयमध्येही माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनीही अशीच मागणी केल्याने भाजपाचा सहभाग असलेल्या तेथील सरकारसमोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८BJPभाजपा