शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

karnataka winter session 2022: बेळगावातील हिवाळी अधिवेशन एक दिवस आधीच गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 12:59 IST

सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी काल गुरुवारी केली घोषणा

प्रकाश बेळगोजीबेळगाव : कर्नाटक विधिमंडळाचे बेळगावातील हिवाळी अधिवेशन निर्धारित मूळ वेळापत्रकाच्या एक दिवस आधीच समाप्त केले जात आहे. गेल्या १९ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनाची ३० डिसेंबर ऐवजी आज गुरुवारी (दि.२९) सांगता होत आहे.सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी काल गुरुवारी ही घोषणा केली. उद्या शुक्रवारी सभागृहातील बहुतांश सदस्यांची प्रतिबद्धता असल्यामुळे त्यांचे कार्यक्रम ठरले असल्यामुळे एक दिवस आधी अधिवेशन समाप्त होत असल्याचे कागेरी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष त्यांचे प्रमुख रणनीतीकार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या शुक्रवारी कर्नाटक दौऱ्यावर येणार असल्यामुळे त्यांच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे, तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे उभयता उद्याच विजयपुरा येथून सुरू होणाऱ्या एकात्मतेचा संदेश देणाऱ्या बस यात्रेचा शुभारंभ करून त्या यात्रेत सहभागी होणार आहेत.

दुसरा विरोधी पक्ष असलेल्या जनता दलाचा बेळगावातील हिवाळी अधिवेशनात किमान सहभाग होता. कारण त्यांचे मुख्य नेते एच. डी. कुमारस्वामी इतर पक्षांच्या नेत्यांबरोबर पंचरत्न यात्रा या आपल्या पक्षाच्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी याचेच विचार डोक्यात असल्यामुळे सर्व राजकीय संलग्नतेवर आमदारांनी दाखवलेली अनास्था हे या हिवाळी अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. खुद्द सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी देखील बऱ्याच मंत्र्यांच्या सभागृहातील गैरहजेरी बद्दल नाराजी व्यक्त केली होती. या खेरीज सभागृहातील वादविवाद प्रसंगी अनेक आमदारांचा विरळ सहभाग दिसत होता.

विधानसभा निवडणूक अवघ्या 100 दिवसांवर असताना बेळगावमध्ये वास्तव्य करावे लागत असल्यामुळे आपल्या निवडणूक तयारीत अडथळा निर्माण झाल्या असल्याची प्रतिक्रियाही  बहुतांश आमदारांनी व्यक्त केली होती.

टॅग्स :Karnatakकर्नाटक