शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मशिंदींवरील लाऊडस्पीकरवर रात्री १० ते सकाळी ६ बंदी; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:49 IST

Karnataka : लाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टींसाठीच करण्यात यावा, असंही पत्रकात करण्यात आलं नमूद

ठळक मुद्देलाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टींसाठीच करण्याच्या सूचनावक्फ बोर्डाच्या पार पडलेल्या ३२७ व्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

कर्नाटक वक्फ बोर्डानं राज्यातील सर्व मशिदी आणि दरग्यांमध्ये रात्री १० ते सकाळी ६ यादरम्यान लाऊडस्पीकरचा वापर न करण्याबाबत पत्रक जारी केलं आहे. लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. ९ मार्च रोजी कर्नाटक वक्फ बोर्डानं हे पत्रक जारी केलं आहे. रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. १९ डिसेंबर २०२० रोजी वक्फ बोर्डाच्या पार पडलेल्या ३२७ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. वक्फ बोर्डाच्या या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारच्या दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला आहे. जुलै २०१७ मध्ये त्या आदेशाद्वारे मशिदी आणि दरग्यांना ध्वनी प्रदुषणाशी निगडीत नियमांचंही पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.केवळ अजान, आवश्यक घोषणांसाठी वापर लाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि आवश्यक घोषणांसाठईच करण्यात यावा. सामान्य घोषणांसाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनाई असेल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकावर काही मशिंदींनी आक्षेप घेतला आगे. आपल्यासाठी सकाळचं नमाज पठण आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बंगळुरूच्या खतीब-ओ-इमाम मशिदीचे मकसूद इम्रान यांनी आपल्याला हे पत्रक मिळाल्याचं म्हटलं आहे. परंतु त्यांनी सकाळचं नमाज पठण महत्त्वाचं असल्याचं सांगत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यात बदल करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMuslimमुस्लीमsiddaramaiahसिद्धरामय्या