शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:32 IST

कविताचं २४ सप्टेंबर रोजी लग्न होणार होतं आणि तिला तिच्या होणार्‍या पतीसोबत फोटोशूटसाठी जायचं होतं, पण नशिबाने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं.

कर्नाटकातील शिवमोग्गा येथे एक भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. कविता असं २६ वर्षीय तरुणीचं नाव असून या महिन्यात तिचं लग्न होणार होती. शिवमोग्गा येथील डुममल्ली क्रॉस येथील साखर कारखान्याजवळ हा अपघात झाला. कविता तिच्या भावासोबत एका खासगी सर्जिकल हॉस्पिटलमधील आपल्या कामावरून परतत होती.

डुममल्ली क्रॉस येथील साखर कारखान्याजवळ एक टीव्हीएस बाईकने कविताच्या बाईकला धडक दिली. यामुळे कविताचा भाऊ संतोष, जो बाईक चालवत होता, त्याचा तोल गेला. नंतर तो बाईकसह फूटपाथवर पडला. कविता रस्त्यावर पडली. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका सिटी बसने कविताला चिरडलं. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

कविताचा भाऊ संतोष या अपघातात किरकोळ जखमी झाला. सोमवारी ही घटना घडली. कविता एका खासगी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करत होती. सोमवार हा कविताचा हॉस्पिटलमधील शेवटचा दिवस होता. तिने नोकरीचा राजीनामा दिला होता. कविताचं २४ सप्टेंबर रोजी लग्न होणार होतं आणि तिला तिच्या होणार्‍या पतीसोबत फोटोशूटसाठी जायचं होतं, पण नशिबाने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं.

कविताने आपल्या लग्नाबाबत खूप स्वप्न पाहिली होती. अपघाताची माहिती मिळताच भाजपा आमदार आणि रुग्णालयाचे मालक डॉ. धनंजय सरजी यांनी शोक व्यक्त केला. भाजपा आमदारांनी कविताच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. कविताच्या घरी आनंदाचं वातावरण होतं. कुटुंबीय लग्नाची जोरदार तयारी करत होते. पण या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातKarnatakकर्नाटक