शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षणाबाबत कर्नाटक सरकारचा यू-टर्न, मुख्यमंत्र्यांकडून पोस्ट डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 17:53 IST

Karnataka Reservation Bill : या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्यानंतर कर्नाटक सरकारचे मंत्री डॅमेज कंट्रोल करण्यात गुंतले आहेत.

बंगळुरू : कर्नाटक सरकारने खासगी कंपन्यांमध्ये क आणि ड श्रेणीच्या पदांवर स्थानिकांसाठी १०० टक्के आरक्षण अनिवार्य करण्याच्या विधेयकावर यू-टर्न घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून स्थानिक कन्नड भाषिकांना खाजगी कंपन्यांमध्ये १०० टक्के आरक्षणासंदर्भातील पोस्ट काढून टाकली आहे. 

या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्यानंतर कर्नाटक सरकारचे मंत्री डॅमेज कंट्रोल करण्यात गुंतले आहेत. राज्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक लोकांसाठी ७० टक्के आणि व्यवस्थापकीय स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते की, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व खाजगी उद्योगांमध्ये क आणि ड श्रेणीच्या पदांसाठी १०० टक्के कन्नड लोकांची भरती अनिवार्य करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले आहे. तसेच, आम्ही कन्नड समर्थक सरकार असल्याचे सांगत कन्नड लोकांचे कल्याण हे आमचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले होते. मात्र, यावरून वाद वाढल्यानंतर सिद्धरामय्या यांनी पोस्ट हटवली आहे.

नवीन विधेयक मंजूरदरम्यान, वादानंतर कर्नाटक सरकारने नव्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. कामगार मंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकारने व्यवस्थापन स्तरावर ५० टक्के आणि बिगर व्यवस्थापन स्तरावरील ७० टक्के लोकांना खासगी कंपन्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आवश्यक कौशल्ये राज्यात उपलब्ध नसल्यास त्यांना आउटसोर्स करून येथे काम दिले जाऊ शकते, असे ते म्हणाले. त्याचवेळी कर्नाटकचे मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, कर्नाटकात राहणाऱ्या लोकांनी कन्नड भाषा शिकली पाहिजे.

कर्नाटकचे स्थानिक कोण?कर्नाटकात जन्मलेले, १५ वर्षांपासून राज्यात वास्तव्य करणारे, कन्नड भाषेत प्रवीण असलेले आणि नोडल एजन्सीची आवश्यक परीक्षा उत्तीर्ण असलेलेच उमेदवार स्थानिक मानले जाणार आहेत. बंगळुरूमधील कंपन्यांमध्ये सर्वाधिक इतर राज्यातील कर्मचारी आहेत. बहुतांश उत्तर भारत, आंध्र आणि महाराष्ट्रातील आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार बंगळुरुतील एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकांना कन्नड येत नाही.

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnatakकर्नाटकjobनोकरीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण