शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

कर्नाटकची तयारी? गोयल गेले देवेगौडांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 02:12 IST

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडी-एस) पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतल्याने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०१८ मध्ये मे किंवा एप्रिलमध्येच कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त होते.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी माजी पंतप्रधान आणि जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडी-एस) पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतल्याने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०१८ मध्ये मे किंवा एप्रिलमध्येच कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त होते. तथापि, गोयल यांच्या या राजकीय खेळीने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.कर्नाटकातील विशेषत: देवेगौडा यांच्या हसन जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पाबाबत गोयल यांनी देवेगौडा यांच्याशी चर्चा केली असली तरी जेडीएस राज्यातील राजकारणातील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीयदृष्टीकोनातून पाहिले जात आहे.भाजप आणि देवेगौडा यांच्यात राजकीयदृष्ट्या फारसे सख्य नाही. तथापि, देवेगौडा यांची काँग्रेसविरोधी भूमिका लक्षात घेता भाजपा आणि जेडीएस दरम्यान राजकीय समझोत्याच्यादृष्टीने त्याची ही भूमिका भाजपसाठी पूरक ठरु शकत,असा भाजपचा कयास आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जेडीएसपेक्षा कमी मते मिळाली होती. २०१८ च्या निवडणुकीत कर्नाटक काँग्रेसकडून हिसकावून घेण्याचा भाजपचा मनसुबा आहे.तथापि, हे काम म्हणावे तेवढे सोपे नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत ३६.६ टक्के मते घेत काँग्रेसने १२२ जागा जिंकल्या होत्या. जेडीएसने २०.२ टक्के मते घेत ४० जागा पटकावल्या होत्या. दुसरीकडे, १९.९ टक्के मताधार प्राप्त करीत भाजपनेही ४० जागा जिंकल्या होत्या; म्हणून काँग्रेसला आगामी निवडणुकीत सत्तेबाहेरच थोपविण्याचा भाजपने प्रयत्न चालविला आहे; परंतु, कर्नाटकच्या राजकारणातील देवेगौडा यांचे महत्त्व पाहता भाजपला समोरील आव्हानांची जाणीव आहे.प्रकाश जावडेकर हे कर्नाटकचे प्रभारी तर गोयल कर्नाटकचे सह-प्रभारीही आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी खास जबाबदारी सोपवित या दोन्ही मंत्र्यांची यासाठी नियुक्ती केली आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलIndiaभारत