शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमध्ये मतदान होताच पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 11:14 IST

19 दिवसांनंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढले

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होताच गेल्या 19 दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर 21 पैसे वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्यानं ही दर वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र गेल्या 19 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढूनही पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. दिल्लीत पेट्रोलचे दर 74.63 रुपयांवरुन 74.80 प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 65.93 रुपयांवरुन 66.14 रुपये प्रति लिटरवर गेले आहेत. या दर वाढीमुळे डिझेलच्या दरानं उच्चांक गाठला आहे. तर पेट्रोलनंदेखील 56 महिन्यांमधील सर्वाधिक दर नोंदवला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन आठवडे असताना पेट्रोल, डिझेलचे दर वाढले होते. मात्र त्यानंतर गेले तीन आठवडे इंधनाच्या दरांमध्ये बदल झाला नाही. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर दररोज आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींप्रमाणे बदलत राहतात. मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं मतदान होण्याच्या 19 दिवसांपासून या दरांमध्ये कोणाताही बदल झाला नव्हता. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किमतींनुसार पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये बदल न झाल्यानं इंधन कंपन्यांचं 500 कोटी रुपयांचं नुकसान झालं. याच काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घसरल्याचा फटकादेखील इंधन कंपन्यांना बसला. 24 एप्रिलला पेट्रोल, डिझेलचे दर वाढले होते. मात्र यानंतर 19 दिवस दरांमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. या 19 दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे दर प्रति बॅरल 74.84 डॉलरवरुन 82.93 डॉलरवर पोहोचले.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल