शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

कर्नाटकी त्रांगडे कायम, सरकारचा फैसला आज, भाजपचे अहोरात्र धरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 06:14 IST

१६ आमदारांच्या राजीनाम्याने कोसळण्याच्या बेतात असलेल्या एच. डी. कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अधांतरी ठेवून कर्नाटकमधील सत्तानाट्याने गुरुवारी अनपेक्षितपणे नवे वळण घेतले.

बंगळुरू : सत्ताधारी आघाडीतील १६ आमदारांच्या राजीनाम्याने कोसळण्याच्या बेतात असलेल्या एच. डी. कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अधांतरी ठेवून कर्नाटकमधील सत्तानाट्याने गुरुवारी अनपेक्षितपणे नवे वळण घेतले. सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान न घेताच विधानसभा अध्यक्षांनी सभागृह शुक्रवारपर्यंत तहकूब केले. याचा निषेध म्हणून ‘जोपर्यंत मतदान होणार नाही तोपर्यंत हलणार नाही’, असे जाहीर करून सत्तातुर भाजपच्या सदस्यांनी विधानसभेतच अहोरात्र धरणे सुरू केले.आधी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सकाळी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. परंतु त्यावर चर्चा होण्याऐवजी नवनवे मुद्दे काढून सत्ताधारी व विरोधी भाजप यांच्यात दिवसभर आरोप-प्रत्यारोप व त्यावरून धिंगाणा होत राहिला. काहीही करून ठरावावरील मतदान होता होईतो लांबविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता, तर मध्यरात्र झाली तरी चालेल, पण मतदान आजच व्हायला हवे, असा भाजपचा आग्रह होता.ठराव मांडल्यावर सर्वप्रथम काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. आपापल्या सदस्यांना ‘व्हिप’ काढणे व त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे हा प्रत्येक पक्षाचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु बंडखोर आमदारांना गैरहजर राहण्याची मुभा देणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने घटनात्म पेच निर्माण झाला आहे. अध्यक्षांनी आधी याचा निर्णय केल्याशिवाय विश्वासदर्शक ठराव तहकूब ठेवला जावा, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून बरीच खडाजंगी झाली. मला कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल, असे अध्यक्षांनी सांगितले.यानंतर श्रीमंत पाटील या आमच्या आमदारास भाजपने पळवून नेल्याच्या काँग्रेसच्या आरोपावरून गोंधळाचे दुसरे पर्व सुरू झाले. हे श्रीमंत पाटील पक्षाच्या इतर आमदारांसोबत रिसॉर्टमध्ये होते. पण बुधवारी रात्री ते अचानक ‘गायब’ झाले व एकदम मुंबईत प्रकटले. प्रकृती बिघडल्याने त्यांना आधी बॉम्बे इस्पितळात व नंतर सेंट जॉर्जेस इस्पितळात दाखल केले गेले.त्यांचा स्ट्रेचरवर झोपलेल्या अवस्थेतील फोटो दाखवून काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपच्या नावाने शिमगा सुरू  केला. असाच गोंधळ आणखी काही काळ सुरु राहिल्यावर विधानसभा अध्यक्षांनी दु. ३पर्यंत सभागृह तहकूब केले. दरम्यानच्या काळात विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी अ‍ॅडव्होकेट जनरलना बोलावून घेतले व त्यांचा कायदेशीर सल्ला घेतला. तर भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राज्यपाल वजूभाई वाला यांना भेटले. थोड्या वेळाने राज्यपालांकडून पत्ररूपाने विधानसभा अध्यक्षांना एक ‘संदेश’ पोहोचविण्यात आला. त्यात राज्यपालांनी म्हटले होते की, मुख्यमंत्र्यांनी सदासर्वकाळ सभागृहाचा विश्वास संपादन केलेला असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर गुरुवारचा दिवस संपण्याआधीच मतदान घेतले जावे.दुपारी सभागृह पुन्हा सुरु झाल्यावर राज्यपालांचे हे पत्र आधीपासून सुरु असलेल्या खडाजंगीत आणखी तेल ओतणारे ठरले. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांना व सभागृहाला असा आदेश देऊच कसा शकतात, असा सवाल करत सत्ताधाºयांनी विश्वासदर्शक ठराव रोखून धरला. सायंकाळपर्यंत हेच चित्र कायम राहिले. शेवटी चर्चा वा मतदान न होताच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. (वृत्तसंस्था)>आज दुपारपर्यंतची मुदतविधानसभा अध्यक्षांनी सभागृह तहकूब केल्यानंतर राज्यपालवजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पत्र लिहून शुक्रवारीदु. १.३० वाजेपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामी