शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्यावर आज होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 08:36 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.

बेंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जनता दल (एस)च्या आमदारांनी राजीनामे देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

सरकार वाचवण्यासाठी बंडखोरांना मंत्री करता यावे आणि भाजपाचा सरकार पाडण्याचा डाव उलटून लावावा, यासाठी दोन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी सोमवारी पदाचे राजीनामे दिले. मात्र, दोन अपक्ष मंत्री एच. नागेश व आर. शंकर यांनी राजीनाम्याबरोबरच कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबाही काढून घेतला.

दरम्यान, आमदारांच्या राजीनामा नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण, या आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभाध्यक्ष रमेश कुमार आज निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांना आमदारांचे राजीनामे घेऊ नका, असे सांगितले आहे. तसेच, सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने आपल्या आमदारांची आज सकाळी साडे नऊ वाजता विधानसौदामध्ये बैठक बोलविली आहे. 

आमदाराकीचा राजीनामा दिलेले सारे जण मुंबईच्या सोफीटेल हॉटेलात मुक्कामास होते. काँग्रेस व जनता दलाच्या सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले आहेत. तेथून ते कर्नाटकात परतणार की, सरकार पडेपर्यंत तिथेच थांबणार, हे स्पष्ट झालेले नाही.

काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा द्यावाकर्नाटक मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा निर्णय उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सिद्धरामय्या, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर काही वेळातच सरकारमधील जनता दलाच्या सर्व मंत्र्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले. काँग्रेसच्या मंत्र्यांनी स्वत:हून राजीनामे दिले, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटक