शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Election 2018- निवडणुकांमुळे उत्तर कर्नाटकातील विमानतळ गजबजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 13:10 IST

विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते, अभ्यासक, पत्रकार यांची वर्दळ कर्नाटकाच्या विविध भागांमध्ये वाढली आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागातील एरव्ही फारसे चर्चेत नसणारे विमानतळ आता या येण्याजाण्याने चांगलेच गजबजले आहेत. ​​​​​​​

हुबळी- निवडणुकांमुळे केवळ राजकीय वातावरणात हालचाल वाढत नाही तर इतरही आर्थिक, सामाजिक घडामोडी घडत असतात असे म्हटले जाते. कर्नाटकात सध्या अशीच परिस्थिती दिसून येत आहे. विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते, अभ्यासक, पत्रकार यांची वर्दळ कर्नाटकाच्या विविध भागांमध्ये वाढली आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागातील एरव्ही फारसे चर्चेत नसणारे विमानतळ आता या येण्याजाण्याने चांगलेच गजबजले आहेत.उत्तर कर्नाटकात बेळगाव, हुबळी, बिदर (भारतीय वायूसेनेचा तळ), तोरणगळ्ळू (बळ्ळारी जिल्हा), बलदोटा-कोप्पळ इथल्या विमानतळावर प्रचारासाठी येणाऱ्या-जाणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांमुळे हालचाल वाढली आहे. कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते विमानप्रवासाला पहिली पसंती देत असल्याचे या येण्या-जाण्यामुळे दिसून येत आहे. हुबळीच्या विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी प्रवासी या प्रचाराच्या काळात येऊन गेले आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काही दिवसांपुर्वीच तोरणगळ्ळू येथे असणाऱ्या जिंदाल विद्यानगर विमानतळाचा वापर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच उत्तर कर्नाटकाच्या दौऱ्यावर येणार आहेत. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे  एच. डी. देवेगौडा आणि एच. डी कुमारस्वामी यांच्याही उत्तर कर्नाटकात सभा होणार असून या नेत्यांबरोबर येणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही येथिल विमानतळांचा वापर करतील.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८AirportविमानतळKarnatakकर्नाटक