आता मंगळुरूतील मशिदीच्या दुरुस्तीवेळी आढळले मंदिराचे अवशेष, हिंदू संघटना थेट पूजेसाठी पोहोचल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:18 AM2022-05-25T11:18:40+5:302022-05-25T11:18:58+5:30

Section 144 imposed in Mangaluru: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान एक शिवलिंग सापडल्यानंतर कर्नाटकातील मंगळुरूमध्येही असंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे.

karnataka hindu organisation plan to hold rituals outside mouque in mangaluru section 144 imposed | आता मंगळुरूतील मशिदीच्या दुरुस्तीवेळी आढळले मंदिराचे अवशेष, हिंदू संघटना थेट पूजेसाठी पोहोचल्या!

आता मंगळुरूतील मशिदीच्या दुरुस्तीवेळी आढळले मंदिराचे अवशेष, हिंदू संघटना थेट पूजेसाठी पोहोचल्या!

Next

Section 144 imposed in Mangaluru: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान एक शिवलिंग सापडल्यानंतर कर्नाटकातील मंगळुरूमध्येही असंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. मलाली परिसरातील जुन्या मशिदीखाली हिंदू मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. मशीद की मंदिर याचा प्रश्न आता गंभीर होत असून हिंदू संघटना मशिदीजवळील मंदिरात विशेष पूजा करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. मंगळुरु दक्षिणचे आमदार भरत शेट्टी हेही स्थानिक लोकांसोबत पूजेला पोहोचले आहेत.

वादग्रस्त मशिदीची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी हिंदू संघटनांनी विशेष पूजा सुरू केली असून ती दुपारी ३ वाजेपर्यंत चालणार आहे. या पूजेसाठी खास पुजारी गोपाळ कृष्ण पणीकर यांना पाचारण करण्यात आलं आहे. या ठिकाणी कोणते मंदिर होते आणि कोणत्या देवतेचे मंदिर होते हे स्पष्ट झाल्यास आम्ही कायदेशीर लढाई पुढे करू, असे विश्व हिंदू परिषदेचे मत आहे.

विशेष पूजेसाठी केरळमधून पुजारीही खास बोलावण्यात आले आहेत. याठिकाणी मंदिर होतं असं पुजाऱ्यांचं म्हणणं असेल, तर हिंदू संघटना कायदेशीर लढा देऊन जमिनीवर हक्क सांगतील. 

मलाली परिसरात कलम 144 लागू
मशिदीजवळील मंदिरात हिंदू संघटनेने आयोजित केलेल्या विशेष पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. याशिवाय मंदिर आणि वादग्रस्त ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दुरुस्तीदरम्यान मंदिराचे अवशेष सापडले
मलाली भागातील एका मशिदीत पुनर्बांधणीचे काम सुरू असताना एप्रिल महिन्यात जुनी मशीद पाडण्यासाठी मंदिरासारखी रचना दिसली. यासोबतच हिंदू कलाकृतींसारखे दिसणारे काही पुरावे सापडले. माहिती मिळताच हिंदू संघटनांनी (विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल) जाऊन जागेची पाहणी केली.

प्रकरण सध्या कोर्टात
तणाव वाढू नये म्हणून प्रशासनही या ठिकाणी पोहोचले. मशिदीशी संबंधित कागदपत्रे घेण्यात आली आणि मशिदीच्या जमिनीशी संबंधित सरकारी कागदपत्रेही जमा करण्यात आली. या जमिनीवर मशीद होती की पूर्वी येथे मंदिर होते हे स्पष्ट होत नाही. तोपर्यंत मशिदीच्या पुनर्बांधणीवर बंदी घालण्यात आली असून कोणालाही त्या जागेवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

Web Title: karnataka hindu organisation plan to hold rituals outside mouque in mangaluru section 144 imposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.