शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अटकेनंतर 'गायब' झाले होते भाजप आमदार, 5 दिवसांनी जोरदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 21:19 IST

मदल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला 40 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुलासह अन्य चौघांनाही अटक करण्यात आली. 

बंगळुरू : कर्नाटकचे भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना भ्रष्टाचार प्रकरणी उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला आहे. यानंतर मदल विरुपक्षप्पा यांचे त्यांच्या गावी दावणगेरे येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, मदल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला 40 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मुलासह अन्य चौघांनाही अटक करण्यात आली. 

मुलाच्या अटकेनंतर आमदार मदल विरुपक्षप्पा हे गेले 5 दिवस गायब झाले होते. मात्र, आता या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर मदल विरुपक्षप्पा समोर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. तसेच, यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी गाडीतून लोकांच्या दिशेने हात फिरवला. तसेच, यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड (KSDL) कंत्राट घोटाळ्यात मदल विरुपक्षप्पा यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. याप्रकरणी त्यांचा मुलगा प्रशांत मदल याला लाच घेताना पकडले होते. KSDL कार्यालयात 40 लाखांची लाच घेतल्याच्या आरोपावरून लोकायुक्त पोलिसांनी 2 मार्च रोजी प्रशांतला अटक केली. प्रशांत हे बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण ​​मंडळात मुख्य लेखा अधिकारी आहेत. आपल्या मुलाच्या अटकेनंतर चन्नागिरीचे भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने आमदार मदल विरुपक्षप्पा यांना आदेशाची प्रत मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जामिनावर बाहेर असताना साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, असे निर्देशही न्यायालयाने मदल विरुपक्षप्पा यांना दिले आहेत. या अर्जाची सुनावणी 17 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटक