शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार संकटात, दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 15:30 IST

कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

बंगळुरू- कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश यांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आज मकरसंक्रांत आहे. त्यामुळे याच दिवशी सरकार बदलावं, असं मला वाटतं. सरकार हे कार्यक्षम असलं पाहिजे, असे अपक्ष आमदार आर. शंकर म्हणाले आहेत. तर एच. नागेश यांनीही पाठिंबा काढल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस-जेडीएसच्या आघाडीचे पक्ष स्थिर सरकार देतील, अशी आशा होती. त्या दोन्ही पक्षांमध्ये कोणतंही सामंजस्य नाही. त्यामुळेच काँग्रेस-जेडीएसचा पाठिंबा काढून मी भाजपाला पाठिंबा देणार आहे, असं म्हणत एच. नागेश यांनीही काँग्रेस-जेडीएस सरकारवर हल्लाबोल केला आहे.तत्पूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजपानं जोरदार प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी भाजपानं काँग्रेसचे काही आमदार गळाला लावले असून, 17 जानेवारीपर्यंत भाजपा सरकार पाडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केला होता. तर काँग्रेसला स्वत:चे आमदार सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी केला होता.कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण 116 आमदार आहेत. तर भाजपाच्या आमदारांची संख्या 104 इतकी आहे. काँग्रेस-जेडीएसला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांना आता तो पाठिंबा काढून घेतला आहे. यासोबतच बहुजन समाज पार्टीचा एक आमदारदेखील त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ 119 वर जातं. अपक्ष आमदार आर. शंकर आणि बहुजन समाज पार्टीच्या एन. महेश यांची कॅबिनेटमधून गच्छंती करण्यात आल्यानं त्यांचे सत्ताधाऱ्यांसोबतचे संबंध ताणले गेले आहेत.विधानसभेतील आमदारांची संख्या 207 वर आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा परिस्थितीत बहुमताचा आकडा 104 होईल. भाजपाकडे सध्या इतकेच आमदार आहेत. मात्र यासाठी भाजपाला सत्तेत असलेल्या 16 आमदारांचे राजीनामे आवश्यक आहेत.दोन अपक्ष आणि एक बसपा आमदार यांची नाराजी भाजपाच्या पथ्यावर पडू शकते. मात्र इतक्या आमदारांच्या राजीनाम्यांबद्दल राजकीय विश्लेषक महादेव प्रकाश यांनी शंका व्यक्त केली. निवडणूक होऊन फक्त 7 महिने झाले आहेत. त्यामुळे इतके आमदार राजीनामे देतील, असं वाटत नसल्याचं प्रकाश म्हणाले. 

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण