शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा खटला; राज्यपाल गहलाेत यांनी दिली परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 05:29 IST

MUDA Scam : राज्यपाल गहलाेत यांनी २६ जुलै राेजी नाेटीस जारी करून सिद्धरामय्या यांना ७ दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले हाेते.

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविराेधात जमिनीशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात खटला चालणार आहे. राज्यपाल थावरचंद गहलाेत यांनी यास परवानगी दिली. जमिनीचा माेबदला मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे जाेडल्याचा आराेप सिद्धरामय्या यांच्यावर आहे.

राज्यपाल गहलाेत यांनी २६ जुलै राेजी नाेटीस जारी करून सिद्धरामय्या यांना ७ दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले हाेते. त्यावर कर्नाटक सरकारने राज्यपालांना नाेटीस मागे घेण्याचा सल्ला देऊन घटनात्मक अधिकारांचा गैरवापर केल्याचा आराेपही ठेवला हाेता. त्यानंतर शनिवार १७ ऑगस्ट राेजी राज्यपालांनी खटला चालविण्यास परवानगी दिली. अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या मूल्यापेक्षा अनेक पट जास्त किमतीचे भूखंड देण्यात आल्याचा आराेप आहे. (वृत्तसंस्था)

काय आहे प्रकरण?म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने (एमयूडीए) १९९२मध्ये नागरी वसाहतींसाठी शेतकऱ्यांकडून काही जमीन ५० टक्के याेजनेतून अधिग्रहित केली हाेती. सिद्धरामय्या यांची पत्नी पार्वती यांच्याकडे म्हैसूर जिल्ह्यातील केसारे गावात ३ एकर १६ गुंठे जमीन हाेती. ही जमीन त्यांचा भाऊ मल्लिकार्जुन यांनी २०१० मध्ये भेट दिली हाेती. ही जमीन त्यांनी २००४ मध्ये बेकायदा खरेदी केली हाेती, असा आराेप आहे. या जमिनीच्या माेबदल्यात मिळालेल्या जमिनीची किंमत तुलनेत खूप जास्त असून सिद्धरामय्या यांनी बनावट सादर केल्याचा आराेप आहे. 

काॅंग्रेसची साेमवारी राज्यव्यापी निदर्शनेमुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्याविराेधात खटला चालविण्यास परवानगी दिल्याच्या विराेधात साेमवार १९ ऑगस्ट राेजी सकाळी ११ वाजता कर्नाटकमध्ये काॅंग्रेसने राज्यभर निदर्शने आयाेजित केली आहेत. 

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnatak Politicsकर्नाटक राजकारण