शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Exit Poll : कर्नाटकच्या फायनल एक्झिट पोलमध्ये आकडे बदलले, अता कुणाचं येणार सरकार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 23:29 IST

जेडीएसला 16 ते 26 जागा मिळू शकतात. तसेच, दोन ते सहा जागा इतरांच्या खात्यातही जाऊ शकतात.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शनिवारी (१३ मे रोजी) हा निकाल जाहीर होत आहे. मतदानानंतर समोर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बहुमतात अथवा त्याच्या जवळपास दिसत आहे. मात्र आता पुन्हा एकदा निकालात एक्झिट पोलचे आकडे बदलले आहेत. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलने त्यांची अंतिम आकडेवारी अपडेट केली आहे. यापूर्वी यात काँग्रेसला 100 ते 112 जागा देण्यात आल्या होत्या, त्या आता 120 ते 140 करण्यात आल्या आहेत. अर्थात, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता आहे. याशिवाय, भाजपच्या जागा 59 ते 79 च्या दरम्यान कमी कण्यात आल्या आहेत. जेडीएसला 16 ते 26 जागा मिळू शकतात. तसेच, दोन ते सहा जागा इतरांच्या खात्यातही जाऊ शकतात.

कुठल्या जातीची मते कुणाला? -सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये, कुठल्या जातीच्या लोकांनी कुणाला मतं दिले? असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. यात लिंगायत समाजाची 56% मते भाजपला, 26 टक्के काँग्रेसला, 12 टक्के जेडीएसला आणि सहा टक्के इतरांना जाताना दिसत आहे. वोक्कालिगा समाजासंदर्भात बोलायचे झाल्यास, काँग्रेसला 32 टक्के, भाजपला 28 टक्के, जेडीएसला सर्वाधिक 35 टक्के आणि इतरांना पाच टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय, मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मते काँग्रेसच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 75 टक्के, जेडीएसला 11 टक्के, भाजपला आठ टक्के आणि इतरांना सहा टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

ओबीसी मते -याच बरोबर, ओबीसींचे भाजपला ४५ टक्के, काँग्रेसला ३५ टक्के, जेडीएसला १४ टक्के आणि इतरांना ६ टक्के मते मिळू शकतात. तसेच, एससी मतांसंदर्भात बोलायचे झाल्यास, काँग्रेसला ५८ टक्के, भाजपला २५ टक्के, जेडीएसला १३ टक्के आणि इतरांना ४ टक्के मते मिळू शकतात. महत्वाचे म्हणजे, आदिवासी मतांच्या बाबतीतही काँग्रेस पुढे दिसत आहे. या समाजाची 46 टक्के मते काँग्रेस, 35 टक्के भाजपा, 13 टक्के जेडीएस आणि सहा टक्के इतरांना मिळू शकतात.

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाElectionनिवडणूक