शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

नरेंद्र मोदी स्मार्ट पंतप्रधान; देवेगौडा यांची स्तुतीसुमनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 12:53 IST

भाजपा आणि जेडीएस आघाडीच्या चर्चेला उधाण

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख एच. डी. देवेगौडा यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. मोदींनी केलेल्या या स्तुतीसुमनांच्या वर्षावानंतर आता देवेगौडा यांनीही मोदींचं कौतुक केलंय. मोदींमुळे खासदार संसदेत चांगलं काम करताहेत. मोदी हे स्मार्ट पंतप्रधान असून देशातील महत्त्वाचे मुद्दे त्यांना नीट माहिती आहेत, असंही देवेगौडा यांनी म्हटलं. देवगौडा यांनी केलेल्या या कौतुकामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मोदी आणि देवेगौडा यांनी एकमेकांची स्तुती केल्यामुळे भाजपा आणि जेडीएसमध्ये आघाडी होणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र अशी कोणतीही आघाडी होणार नसल्याचं देवेगौडा यांनी स्पष्ट केलंय. मोदींची स्तुती हा शिष्टाचाराचा भाग असून त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असं देवेगौडांनी म्हटलंय. '2014 मध्ये भाजपाला बहुमत मिळाल्यास लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देईन, असं मी म्हटलं होतं. मी तसा निर्णयही घेतला होता. मात्र मोदींनी याबद्दल मला फेरविचार करण्यास सांगितलं. त्यांनी मला निर्णय बदलण्याचा आग्रह केला. लोकसभेत देशाला वरिष्ठ नेत्यांची आवश्यकता आहे, असं मोदींनी त्यावेळी मला सांगितलं होतं,' असंही देवगौडा म्हणाले. यावेळी देवेगौडा यांनी राहुल गांधींवरही भाष्य केलं. 'राहुल गांधी माझ्याबद्दल जे काही म्हणाले, ते मोदींना ऐकलं असेल. त्यामुळे शिष्टाचाराचा भाग म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं. याचा अर्थ आमच्यातील राजकीय मतभेद संपले, असा होत नाही,' असंही देवेगौडा यांनी म्हटलं. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान होईल आणि 15 मे रोजी मतमोजणी होईल. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Narendra Modiनरेंद्र मोदी