शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Karnataka Elections : 90 व्या वर्षी एचडी देवेगौडांनी हाती घेतली प्रचाराची धुरा; पक्षाला फायदा होणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 19:30 IST

माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) नेते एचडी देवेगौडा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सक्रिय दिसत आहेत.

Karnataka Election: माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) नेते एचडी देवेगौडा 90 व्या वर्षीही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सक्रिय दिसत आहेत. त्यांनी सोमवारी (24 एप्रिल) कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. तुमकूर या जिल्ह्यातून 1994 मध्ये JD(S) ने 11 पैकी 9 जागा जिंकल्या होत्या. पक्ष पुन्हा एकदा याठिकाणी आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. 

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांना चालण्यास त्रास होतो, तरीदेखील ते उत्साहाने या निवडणुकीत सहभाग नोंदवत आहेत. चालताना त्यांना त्यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी मदत घ्यावी लागते, पण जेव्हा ते बोलतात, तेव्हा त्यांचे शब्द ऐकणाऱ्याला विचार करायला भाग पाडतात. देवेगौडा त्यांचा मुलगा आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

जनता दल (सेक्युलर) पट्टनायकनहल्ली मठावर लक्ष ठेवून आहे. मठाचे अध्यक्ष द्रष्टा नांजावधूत स्वामी आणि वोक्कलिगा समुदायाचे सदस्य आहेत. त्यांचा 11 मतदारसंघांवर मोठा प्रभाव आहे. या जागांवर वोक्कालिगा समुदायाची लोकसंख्या 40% च्या दरम्यान आहे. देवेगौडा हे राज्यातील सर्वात दिग्गज वोक्कालिगा नेते आहेत. त्यामुळे जनता दल (सेक्युलर) या जागांवर विशेष लक्ष ठेवून आहे.

आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करताना एचडी देवेगौडा म्हणाले, “मी वयाच्या 90 व्या वर्षी हे काम हाती घेतले आहे. 10 मे रोजी निवडणुका आहेत. मी 8 मेच्या संध्याकाळपर्यंत काम करेन. यावेळी माजी पंतप्रधानांनी भाजप सरकारच्या अनेक अपयशी आणि नवीन घोषणांवर निशाणा साधला. आता त्यांचा किती प्रभाव पडतो, हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट दिसेल. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकh d deve gowdaएच. डी. देवेगौडा