शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

Karnataka Elections 2023: 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', सोनिया गांधींनी RSS कार्यकर्त्याचा प्रचार केल्यामुळे ओवेसींची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 14:24 IST

Karnataka Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत.

Asaduddin Owaisi On Sonia Gandhi: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्नाटकात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या जगदीश शेट्टर यांचा प्रचार केल्यामुळे गांधी यांच्यावर टीका होत आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ओवेसी म्हणाले की, सोनिया गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) उमेदवाराचा प्रचार करतील अशी अपेक्षा नव्हती.

एआयएमआयएम खासदार ओवेसी यांनी पुढे म्हटले की, हीच तुमची धर्मनिरपेक्षता आहे का? अशा प्रकारे मोदींशी लढणार का? मॅडम सोनिया गांधी जी, तुम्ही आरएसएसच्या लोकांच्या प्रचारासाठी याल अशी मला अपेक्षा नव्हती. जगदीश शेट्टर हे आरएसएसचे आहेत. वैचारिक लढाईत काँग्रेस अपयशी ठरली असून त्यांचे विदूषक, नोकर, गुलाम माझ्यावर आरोप करतात ही शरमेची बाब आहे, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसचे शेट्टारबाबत मतकाँग्रेसने हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांना उमेदवारी दिली आहे. तिथूनच ते गेल्या विधानसभेत भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. काँग्रेसने शेट्टर यांच्या पक्षात सामील झाल्याचा बचाव केला आणि दावा केला की कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आरएसएसशी संलग्न असूनही ते "धर्मनिरपेक्ष व्यक्ती" आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?शनिवारी (6 मे) सोनिया गांधी यांनी तीन वर्षांनंतर पहिली सभा घेतली. राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि जगदीश शेट्टर यांच्यासोबत त्या एकाच मंचावर दिसल्या. यावेळी त्यांनी 'द्वेष' पसरवल्याबद्दल भाजपवर हल्लाबोल केला. याच सभेवरुन काँग्रेस आरएसएसशी संबंधित उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatakकर्नाटक