शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Election 2018- या गावात एक, दोन नव्हे, तब्बल 30 सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 09:04 IST

कर्नाटकातील एका गावात एक, दोन नव्हे, तर जवळपास 30 मुलांचं नाव सिद्धरामय्या ठेवण्यात आलं आहे.

बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचारात दिवसेंदिवस रंगत भरत आहे. राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या निवडणुकीच्या रणसंग्रामात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदीही उडी घेणार आहेत. परंतु या निवडणुकीत कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची जास्त चर्चा आहे. सिद्धरामय्या वारंवार भाजपावर हल्ला चढवताना पाहायला मिळतात. तर भाजपाच्याही रडारवर तेच आहेत. याच दरम्यान सिद्धरामय्या यांच्याबाबत एक उत्सुकता ताणणारी गोष्ट समोर आली आहे.कर्नाटकातील एका गावात एक, दोन नव्हे, तर जवळपास 30 मुलांचं नाव सिद्धरामय्या ठेवण्यात आलं आहे. कर्नाटकातील सिद्धरामागुडी गाव हे सिद्धरामय्या यांचं गाव आहे. या गावात बरीच सिद्धरामय्या नावाचीच मुलं आहेत. कधी कधी असाही योग येतो की जर क्रिकेट टीम तयार करायची असेल तर 11 खेळाडू हे सिद्धरामय्या नावाचेच असतात. सिद्धरामय्या यांनी गाव सोडल्यानंतर राज्यातील सर्वोच्च पदावर ते विराजमान झाले. तेव्हापासून या गावातील काही माणसे स्वतःच्या मुलांना सिद्धरामय्या नाव देण्यासाठी उत्सुक असतात. 5 वर्षांच्या सिद्धरामय्या नावाच्या मुलाला जेव्हा तो व्हीआयपी होणार का, असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, मी स्वतःला असंच काहीसं समजत आहे.मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी विधानसभा जागेवरून निवडणूक लढवत आहेत. या विधानसभा क्षेत्रातच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं गाव आहे. याशिवाय ते बदामी या मतदारसंघातूनही लढणार आहेत. कर्नाटक विधानसभेची मुदत 28 मे रोजी संपत आहे. 12 मे रोजी नव्या विधानसभेसाठी मतदान होईल आणि 15 मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर नव्या सरकारची स्थापना होण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. कर्नाटक विधानसभेत एकूण 224 जागा असून त्यातील 178 जागा सर्वसाधारण वर्गासाठी, 36 जागा अनुसूचित जाती गटासाठी तर 15 जागा अनुसूचित जमाती गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मावळत्या विधानसभेत सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील काँग्रेसला 122 जागा मिळाल्या होत्या. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८siddaramaiahसिद्धरामय्या