शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील 'या' नेत्याची संपत्ती पाच वर्षांत 589 कोटींनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 15:37 IST

कर्नाटकातील एका राजकीय नेत्याच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये झालेली वाढ पाहिली तर तुम्हाला प्रचंड धक्का बसेल. ​​​​​​​

ठळक मुद्दे2013 साली कनकपुरा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत त्यांनी जेडीएसचे पी.जी. सिंदिया यांना पराभूत करुन पुन्हा विधानसभेत प्रवेश केला आणि ऊर्जामंत्रीपद पटकावलं. त्यांचे बंधु डी. के. सुरेश बंगळुरु ग्रामिण मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले आहेत तर त्यांचा चुलतभाऊ एस. रवी कर्नाटक विधानपरिषदेचे सदस्य आहे. शिवकुमार देशातील श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक मानले जातात.

बंगळुरु- सामान्य नोकरदाराची वर्षभरात अगदी 10 ते 20 टक्क्यांनी पगारवाढ होत असते. पाच वर्षांमध्ये पुर्वीच्या पगाराच्या फारतर 60 ते 70 टक्के वाढ साधण्यापर्यंत नोकरदारांची मजल जाते. उद्योजकांच्या पगारात त्याहून वेगाने वाढ होते. पण कर्नाटकातील एका राजकीय नेत्याच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये झालेली वाढ पाहिली तर तुम्हाला प्रचंड धक्का बसेल.कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे डी. के. शिवकुमार यांच्या संपत्तीमध्ये पाच वर्षांमध्ये 589 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या शिवकुमार यांनी गेल्या वर्षी राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस गुजरातमधील काँग्रेसच्या 43 आमदांरा आश्रय देत त्यांचा सर्व खर्च उचलला होता. 2013 साली त्यांनी आपली संपत्ती 251 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते तर आता ती 840 कोटी असल्याचे आपल्या निवडणूक अर्जाबरोबर जाहीर केले आहे.डी. के. शिवकुमार हे कर्नाटकामध्ये डीके नावाने ओळखले जातात. वक्कलिंग समाजाचे वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहेच त्याहून देवेगौडा कुटुंबाला टक्कर देण्याची क्षमता असणारा कॉंग्रेसचा नेता असा लौकिक त्यांनी पक्षात मिळवलेला आहे. 1985 साली डी.के शिवकुमार पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले तेच मुळी एच. डी. देवेगौडा यांच्याविरोधात. सतनूर मतदारसंघात देवेगौडांनी पराभूत केले. पण देवेगौडा तेव्हा होळेनरसिंहपूर मतदारसंघातूनही निवडून गेल्याने त्यांनी ही जागा रिकामी केली. त्यामुळे सतनूरला पोटनिवडणूक घेतल्यानंतर शिवकुमार यांचा विजय झाला. 1989 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत देवेगौडांनी त्यांचा पुन्हा पराभव केला. तर 1994 साली एच.डी. कुमारस्वामी यांच्याकडून शिवकुमारना पराभव सहन करावा लागला. असं असलं तरी शिवकुमार यांनी पक्षामध्ये आणि कर्नाटकात राजकीय नेता म्हणून चांगलाच  जम बसवायला सुरुवात केली होती. कॉंग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं.

2013 साली कनकपुरा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत त्यांनी जेडीएसचे पी.जी. सिंदिया यांना पराभूत करुन पुन्हा विधानसभेत प्रवेश केला आणि ऊर्जामंत्रीपद पटकावलं. त्यांचे बंधु डी. के. सुरेश बंगळुरु ग्रामिण मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले आहेत तर त्यांचा चुलतभाऊ एस. रवी कर्नाटक विधानपरिषदेचे सदस्य आहे. शिवकुमार देशातील श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक मानले जातात. 2013 साली निवडणुकीत अर्ज भरताना त्यांनी आपली संपत्ती 251 कोटी असल्याचे जाहीर केले होते, 2008 साली ती 176 कोटी रुपये इतकी होती. पाच वर्षांमध्ये इतक्या वेगाने संपत्ती वाढल्याचे पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.  आता तर त्यांनी स्वतःचे सर्व विक्रम मोडत 840 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण