शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 18:24 IST

देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. ही जोडगोळी म्हणजे...

बेंगळुरू - देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. ही जोडगोळी म्हणजे, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि माजी मंत्री बी. श्रीरामुलू.

पाच वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला २२४ पैकी फक्त ४० जागा जिंकता आल्या होत्या, तर काँग्रेसनं १२२ जागांवर बाजी मारत बहुमत मिळवलं होतं. येडियुरप्पा आणि श्रीरामुलू  स्वतंत्रपणे लढल्यानं झालेल्या मतविभाजनाचा फटका भाजपाला बसल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं. २०१२ मध्ये भाजपाला राम-राम ठोकलेल्या येडियुरप्पांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन करून ही निवडणूक लढवली होती. त्यांनी सहा जागांवर विजय मिळवला होता आणि ३५ मतदारसंघांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्याचवेळी, श्रीरामुलू यांच्या बीएसआर काँग्रेसनं चार जागा जिंकल्या होत्या.  

येडियुरप्पा भाजपासोबत असते तर कर्नाटक जनता पक्षाला मिळालेल्या सहा जागा आणि मतं त्यांच्या पारड्यात पडली असती. त्यामुळे त्यांची बेरीज ७४ पर्यंत गेली असती. बीएसआरच्या जागा आणि मतांच्या जोरावर त्यांनी ८०चा आकडा सहज पार केला असता, याकडे राजकीय जाणकार लक्ष वेधतात. 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत येडियुरप्पा आणि श्रीरामुलू हे दोघंही भाजपासोबत होते. मोदी लाट आणि या दोघांचं पक्षातील पुनरागमन या जोरावर, कर्नाटकातील तब्बल १३३ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचं 'कमळ' फुललं होतं. आज मोदी लाट ओसरली असली, तरी येडियुरप्पा आणि श्रीरामुलू पक्षासोबत असणं ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते, असं विश्लेषकांनी नमूद केलं. 

अर्थात, कर्नाटकची लढाई अत्यंत अटीतटीचीच असेल. कारण, 'मिशन २०१९'च्या आधी काँग्रेसकडून आणखी एक राज्य काढून घेऊन भाजपाला आपलं वर्चस्व सिद्ध करायचंय, तर काँग्रेसला हे राज्य राखून आपलं अस्तित्व टिकवायचंय - कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवायचाय. म्हणूनच, कर्नाटकचं सत्तासमीकरण ठरवणाऱ्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलंय. दुसरीकडे, ते कसं खोटं आहे, आधी त्यांनी या प्रस्तावाला कसा विरोध केला होता, हे भाजपा नेते सांगत आहेत. सिद्धरामय्या यांच्या कारभारावर ते टीकास्त्र सोडताहेत, पण त्यात त्यांनी उशीर केल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

कर्नाटकात १२ मे रोजी मतदान होतंय. म्हणजेच, अजून २०-२२ दिवस शिल्लक आहेत. त्यात बरंच काही घडेल, प्रचाराचा धुरळा उडेल. त्यावर बरीच गणितं अवलंबून असली, तरी येडियुरप्पा आणि श्रीरामुलू यांच्याकडे भाजपाची मंडळी ट्रम्प कार्ड म्हणूनच बघताहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकPoliticsराजकारणElectionनिवडणूक