शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election 2023 : एकीकडे कर्नाटकचा पेच सुटला, तर दुसरीकडे नाराजीनाट्य; परमेश्वर म्हणाले, “मला उपमुख्यमंत्री तरी…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 13:28 IST

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेला सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील वाद अखेर संपला. तर दुसरीकडे काँग्रेसमधून नाराजीचा सूर येऊ लागलाय.

कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेला पेच अखेर सुटला. काँग्रेसनेसिद्धरामय्या यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला आहे. मात्र, या फॉर्म्युलावर काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्यानं प्रश्न उपस्थित केलाय. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या घोषणेनं दलित समाज दुखावला गेला असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केलं.

सिद्धरामय्या यांच्या मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या जी परमेश्वर यांनी हायकमांडच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. “कर्नाटकमध्ये दलित व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी होती. पण असं झालं नाही. दलित समाज दुखावला गेला आहे. मलाही सरकार चालवता आलं असतं. मुख्यमंत्री नाही तर किमान मला उपमुख्यमंत्री बनवायला हवं होतं,” असं जी परमेश्वर म्हणाले.

अधिकृत घोषणा

कर्नाटकात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला आता निश्चित झालाय. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. तसंच सिद्धरामय्या यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवली जाणार आहेत. याशिवाय २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ते प्रदेशाध्यक्ष म्हणूनदेखील कार्यरत राहतील.

कर्नाटक ते दिल्ली १०० तास सुरू असलेल्या चर्चांनंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सोनिया गंघी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटल्याचं म्हटलं जातंय. आता २० मे रोजी नवं सरकार स्थापन होणार आहे.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेस