शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

Karnataka Election 2018 : कर्नाटकात जिंकणारा पक्षच केंद्रात सत्तेत येईल - बाबा रामदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 11:30 IST

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

बेंगळुरू - अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अटीतटीची लढत याठिकाणी पाहायला मिळत आहे. निवडणुकीचा निकाल येत्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना योगगुरु रामदेव बाबा यांनी मोठे विधान केले. ''कर्नाटक निवडणुकीचा निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल. कारण, जो पक्ष ही निवडणूक जिंकेल त्यांच्यात 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असेल'', असे त्यांनी म्हटले आहे.

 

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र कर्नाटकात स्वाभाविकच या अटीतटीच्या सामन्याच्या निकालाकडे जरा जास्तच उत्सुकता आहे.  पोलिसांनी या सर्व मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.  सोमवारी संध्याकाळपासूनच केंद्रांच्या परिसरात बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. 

मतमोजणी केंद्रांच्या सुरक्षेचे प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक किंवा उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निमलष्करी दल, राखीव पोलीस दलही कर्नाटक पोलिसांच्या मदतीला तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्ताचे प्रमुख असलेल्या प्रत्येक अधीक्षकाला आवश्यकता भासल्यास शीघ्र कृती दलाचा वापर करण्याचे अधिकार दएम्यात आले आहेत. निकालानंतर जल्लोष, मिरवणुकी काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कर्नाटकातील सीमाभागाचा समावेश असलेला मुंबई कर्नाटक, हैदराबाद कर्नाटक, मध्य कर्नाटक, कोस्टल कर्नाटक, म्हैसूर कर्नाटक, बंगळुरु कर्नाटक या सर्व विभागांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. अवघे ४० टक्के मतदान झालेल्या बंगळुरुचा अपवाद वगळता राज्यभरात सत्तरीचा टप्पा ओलांडला गेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अनपेक्षित निकालांचीही शक्यता आहे. त्यामुळेच निकालानंतर भलतं काही घड़ू नये यासाठी पोलिसांनी कमालीची खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८congressकाँग्रेस