शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Karnataka Election 2018:भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा, म्हणाले उद्या घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 12:14 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

बेंगळुरू -  कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. बी.एस.येडियुरप्पा यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवडदेखील करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. 

दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. जेडीएस-काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बेंगळुरूमध्ये काँग्रेस-जेडीएस-भाजपा आपल्या आमदारांसोबत बैठकांवर बैठका घेण्यात व्यस्त झाले आहेत.  

LIVE UPDATES :

- पक्षाने माझी विधिमंडळ नेतेपदी निवड केली. त्याबाबतचं पत्र राज्यपालांना दिलं. मला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल आमंत्रित करतील अशी आशा आहे - येडियुरप्पा- एचडी कुमारस्वामीच कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील आणि हे आघाडीचं सरकार असेल. हेच सत्य आहे. आम्ही कोणाच्या प्रभावाखाली येणार नाही - जेडीएस- बी. एस. येडियुरप्पा आणि प्रकाश जावडेकर राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल.- उद्या शपथ घेणार - येडियुरप्पा - येडियुरप्पा यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड - आमच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळाचा नेता निवडला जाईल. यानंतर आम्ही थेट राज्यपालांकडे जाणार आणि सत्ता स्थापनेचा दावा करणार. -येडियुरप्पा-  मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजपाला धमकावण्याशिवाय दुसरे काहीही येत नाही-  कर्नाटकात काँग्रेसची बैठक सुरू- जेडीएसच्या बैठकीत पक्षाचे दोन आमदार अनुपस्थित, तर काँग्रेसचे चार आमदारही बैठकीला गैरहजर, काँग्रेसचे 78 पैकी 60 आमदार सध्या उपस्थित-  जेडीएसचे आमदार श्रवण यांनी सांगितले की, आमच्या जवळपास 4-5 आमदारांना संपर्क करण्यात आला होता. मात्र आमच्यात फूट पडणार नाही, आमचे 80 टक्के आमदार बैठकीसाठी हजर आहेत. - कांग्रेसनं इग्लटन रिसॉर्टमध्ये आपल्या आमदारांसाठी रुम बुक केल्याची माहिती समोर आली आहे. 120 रुम बुक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. - भाजपच्या घोडेबाजाराची धास्ती, काँग्रेस आपल्या आमदारांना विशेष विमानाने बेंगळुरुला घेऊन जाणार, सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

भाजपाचे नेते येडियुरप्पा, तसेच जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी मंगळवारीदेखील (15 मे) राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊ न सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपाचे १0४ जण निवडून आले आहेत. काँग्रेसचे ७८ व जनता दलाचे ३७ व बसपाचा एक निवडून आले असून, त्यांची बेरीज ११६ होते. सत्तेसाठी सध्या ११२ आमदारांची गरज आहे. भाजपाकडे ७ आमदार कमी असून, ते मिळविण्यासाठी जनता दल व काँग्रेस यांचे आमदार फोडण्याचे प्रयत्न होऊ शकतील. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

राज्यपालांपुढे ४ पर्यायकोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर राज्यघटनेनुसार सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी कोणते पर्याय तपासावेत, याची शिफारस सरकारी आयोगाने केली होती. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यापुढे हे चार पर्याय, त्याच क्रमाने, उपलब्ध आहेत:

१. सर्वाधिक जागा मिळविणारा वा निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या पक्षांना पाचारण करणे.- येथे काँग्रेस आणि जेडीएसने निवडणूकपूर्व आघाडी न केल्याने हा पर्याय कामी नाही. भाजपाला प्रथम बोलविले जाईल.

२. अपक्षांसह इतरांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा सर्वाधिकजागा जिकणाऱ्या पक्षाने केल्यास त्यांना निमंत्रण देणे.- यानुसारही भाजपाला फायदा होईल.

३. निवडणुकीनंतर आघाडी केलेले सर्व पक्ष सरकारमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांना संधी देणे.- भाजपा बहुमतासाठीच्या फोडाफोडीत अपयशी ठरल्यास काँग्रेस-जेडीएसला पाचारण केले जाईल.

४. निवडणुकीनंतर आघाडी केलेल्या पक्षांपैकी काही सरकारमध्ये राहून व काही बाहेरून पाठिंबा देणार असतील, तर त्यांना बोलावणे.- येथेही काँग्रेस-जीडीएसला संधी मिळेल.

 

 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Yeddyurappaयेडियुरप्पा