शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांची बदली, ‘ऑफिसर’ मुलीची एंट्री पित्यानेच केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 08:37 IST

मुलीचे स्वतःच्या पदावर स्वागत करताना वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता, त्यांची छाती अभिमानाने फुलली होती.

कर्नाटकाच्या मंड्या येथील सेंट्रल पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत बीएस व्यंकटेश यांची बदली झाली. बदलीच्याच दिवशी त्यांना सुखद धक्का बसला. कारण, त्यांची मुलगी वर्षा हिने वडिलांच्या हातून त्याच पोलिस स्थानकात पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. वडिलांनी पुष्पगुच्छ देऊन मुलीचे स्वागत केले. हा भावनिक बाप-मुलीचा क्षण इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. मुलीचे स्वतःच्या पदावर स्वागत करताना वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता, त्यांची छाती अभिमानाने फुलली होती.

व्यंकटेश गेल्या १६ वर्षांपासून  सेंट्रल पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांची नुकतीच एसपी कार्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी नवीन उपनिरीक्षक येणार होते; पण त्यांची मुलगी बीव्ही वर्षा हिचीच उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली. वडिलांच्या प्रेरणेतून आणि प्रोत्साहनामुळेच वर्षाने पोलिसांत  जाण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि नशिबाने वडिलांच्या पदावरच तिची पहिली नियुक्ती झाली. वडिलांकडून पदभार स्वीकारल्यामुळे भाग्यवान समजते, असे ती म्हणाली.

 पित्याकडून मुलीने पदभार स्वीकारताच संपूर्ण पोलिस ठाण्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. हृदयस्पर्शी फोटो व्हायरल होत असून, कोणत्याही पित्यासाठी यापेक्षा अभिमानाचा क्षण असूच शकत नाही, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसKarnatakकर्नाटक