शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

RSS संस्थापकांचा धडा अभ्याक्रमातून वगळणार? काँग्रेस मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 14:59 IST

कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर काँग्रेस भाजप सरकारने अभ्यासक्रमात आणलेले काही धडे काढणार असल्याची चर्चा आहे.

Karnataka Congress: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरुन आता कर्नाटकात काँग्रेस-भाजपमध्ये वाद सुरू झाला आहे. सत्तेत येताच काँग्रेसने भाजप सरकारने शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला हेडगेवार यांच्यावरील धडा काढण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे मंत्री दिनेश गुंडू राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले की, आमचे सरकार मागील भाजप सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये आणलेले काही धडे काढून टाकण्याचा विचार करत आहे. अशा लोकांच्या कथा आपल्याकडे असायला हव्यात, ज्यांनी देशाच्या उभारणीत खरे योगदान दिले आहे. जेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा प्रश्न येतो, तेव्हा इतिहासाने अशा लोकांची नावे लक्षात ठेवली पाहिजेत, ज्यांनी त्यात प्रत्यक्ष भाग घेतला होता. भाजपने मुलांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपले वैचारिक मुद्दे घालण्याचा प्रयत्न केला, जे योग्य नाही. काँग्रेसने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुधारात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

अनावश्यक सामग्री काढून टाकली जाईलराज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मुध बंगारप्पा यांनी सांगितले की, शालेय अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक आहे तेच अभ्यासक्रमात ठेवले जाईल. अनावश्यक गोष्टी अभ्यासक्रमातून काढून टाकल्या जातील.

काँग्रेस आमदाराची जहरी टीकाकर्नाटकममधील विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार बीके हरिप्रसाद यांनी हेडगेवार यांना भ्याड आणि बनावट स्वातंत्र्यसैनिक म्हटले. यासोबतच त्यांनी शालेय अभ्याक्रमातून हेडगेवार यांचा आयुष्यावरील धडा वगळण्यावर भर दिला. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्यसैनिक असल्याचा कोणताही पुरावा नाही. भ्याड आणि बनावट स्वातंत्र्यसैनिकांच्या आयुष्यावर आधारित धडे आम्ही मुलांच्या अभ्यासक्रमात कधीही सामील करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.  

टॅग्स :congressकाँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा