शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दलित व्यक्तीसाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार- सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 17:22 IST

सिद्धरामय्या यांनी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष राहील हे भाकित फेटाळून लावले आहे.

बंगळुरू: कर्नाटक विधानसभेच्या मतदानानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. कालच एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या समीकरणांनुसार तयारीला सुरुवात झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. वेळ पडल्यास दलित व्यक्तीसाठी मी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. टीव्ही 9 कन्नड या स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. सिद्धरमय्या यांनी मुलाखतीत म्हटले की, जर कोणा दलित व्यक्तीला मुख्यमंत्रीपद देण्याची गरज पडली तर मी स्वतः मुख्यमंत्रीपदावरून दूर होईन. तत्पूर्वी सिद्धरामय्या यांनी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष राहील हे भाकित फेटाळून लावले. काँग्रेसच स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्तेत येईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, या चाचण्यांच्या निष्कर्षांना त्यांनी मनोरंजक बातम्या म्हटले. मतदानोत्तर चाचण्यांचा पुढील दोन दिवसांत मनोरंजनाचे साधन आहे. एक्झिट पोल हे त्या व्यक्तीसारखे आहेत ज्यांना पोहता येत नाही. मात्र, त्याला या गोष्टींचा दिलासा आहे की, तो यात बुडणार नाही. कारण त्याला नदीची खोली केवळ चार फुट सांगून भ्रमित करण्यात आहे, असे सांगत त्यांनी मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल मानण्यास सपशेल नकार दिला. तर दुसरीकडे मतदानोत्तर चाचण्यांच्या निकालांनुसार किंगमेकर ठरणार असलेल्या जनता दलाने (सेक्युलर) सावध भूमिका घेतली आहे. 'सध्या कोणतीही ऑफर स्वीकारण्याची किंवा नाकारण्याच्या स्थितीत नाही. 15 मे रोजी मतमोजणी सुरू झाल्यावर काय होतं ते पाहू,' असं देवेगौडा यांनी सांगितले.

 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८siddaramaiahसिद्धरामय्या