शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

स्वामींसमोरील माईक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हिसकावला; कार्यक्रमात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 13:18 IST

बंगळुरूमध्ये पावसाने बाधित भागांबाबत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर संत आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील उपस्थित होते.

बंगळुरूमध्ये पावसाने बाधित भागांबाबत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर संत आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात एक स्वामी आणि मुख्यमंत्री यांच्यात वादावादी  झाली या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ईश्वरानंदपुरा स्वामींनी बोलताना व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांवर आरोप केले, यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दुसरीकडे, स्वामी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांचा माईकही हिसकावून घेतल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

भाजप सरकारवर टीका करताना संत ईश्वरानंदपुरा स्वामी म्हणाले की, आम्ही बंगळुरूमध्ये नेहमीच मुसळधार पाऊस पाहतो, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा लोकप्रतिनिधी आणि बीबीएमपीचे अधिकारी तिथे जातात. यावर कायमस्वरूपी उपाय नाही. तो कधी सुटणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'एकदा पाऊस पडला तरी अधिकाऱ्यांना कुठे काम करायचे हेच समजत नाही?, असंही स्वामी म्हणाले, यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. त्यांनी बंगळुरूमध्ये या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. 

यादरम्यान एक वेळ अशी आली की जेव्हा स्वामी स्टेजवरून बोलत होते तेव्हा त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह अनेक लोक मंचावर बसले होते. स्वामीजींनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करताच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातातून माईक घेऊन उत्तर दिले. यावेळी मंचावर वादावादीही झाली.

Pariksha Pe Charcha: PM नरेंद्र मोदींची 'परीक्षा पे चर्चा', 38 लाख विद्यार्थ्यांना दिला गुरुमंत्र

"हे फक्त आश्वासन नाही. त्यासाठी प्रकल्प मंजूर झाला असून निधीही आला आहे." "फक्त आश्वासने देणारा मी मुख्यमंत्री नाही. मी वचन दिले तर ते पूर्णही करतो, अन्यथा मी वचन देत नाही.", असंही सीएम बोम्मई म्हणाले. 

बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावेळी, मान्सूनच्या पावसाने, बेंगळुरूचे रस्ते पूर्णपणे पाण्याने भरले होते.यामुळे वीज पुरवठ्यात व्यत्यय आल्याने आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे काम बंद होते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपा