शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमावादाचे राजकारण करतोय, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 11:50 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: मुंबई काढण्यात आलेला महामोर्चा राजकीय हेतूने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: दिल्लीत सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक सीमा प्रश्नासाठी नव्हे तर सीमेवरील कायदा  सुव्यवस्था राखण्यासाठी होती असे घुमजाव कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. यानंतर आता महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांनीही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील विरोधकांवर टीका केली आहे. 

बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांवर टीका करताना म्हटले आहे की, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका करत, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांवर सीमारेषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बोम्मई यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते. 

सीमावादातून राजकीय फायदा उठविण्याचा निष्फळ प्रयत्न

हाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाबाहेर केलेल्या विधानांवरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे स्पष्ट होते. याआधीच सीमावादातून राजकीय फायदा उठविण्याचा निष्फळ प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. यावेळी ते तसे करण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका बोम्मई यांनी केली. तसेच मुंबई काढण्यात आलेला महामोर्चा राजकीय हेतूने प्रेरित होता, असे बोम्मई यांनी म्हटले आहे. जनतेचा पाठिंबा नसतानाही त्यांनी पक्षाचे झेंडे घेऊन मोर्चा काढला. ज्यात विरोधी पक्षांचे सदस्य आणि त्यांचे पदाधिकारीच सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही स्पष्टपणे दिसून येते, या शब्दांत बोम्मई यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, ज्या वेळी दोन्ही राज्यातील लोक सौहार्दपूर्ण संबंध ठेवत आहेत, व्यवसाय करत आहेत आणि लोक राज्याराज्यांमध्ये प्रवास करत आहेत, अशा वेळी हे नेते कर्नाटकात मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्याचा आणि लोकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे नमूद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :border disputeसीमा वादKarnatakकर्नाटकPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी