शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"हे काय चाललंय, आम्ही वैतागलोय", शेजाऱ्यानेच अडवली CM सिद्धारामय्या यांची कार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 18:05 IST

Senior Citizen stops Siddaramaiah's Car : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यासोबत एक अनोखी घटना घडली. 

Karnataka CM Siddaramaiah : कर्नाटकचेमुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्यासोबत एक अनोखी घटना घडली. सिद्धारामय्या यांच्या शेजारी राहत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने त्यांच्याकडे तक्रार केली असून पार्किंगच्या समस्येवरून नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर कर्नाटकचेमुख्यमंत्री कृपा रोड येथे राहत असून त्यांच्या निवासस्थानाच्या समोरच तक्रार करणाऱ्या नरोत्तम यांचे घर आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नरोत्तम हे जोरजोरात ओरडत असल्याचे दिसते. सर्वप्रथम त्यांचा संघर्ष सुरक्षा रक्षकांसोबत होतो. नंतर अधिकाऱ्यांसोबत बराच वेळ वाद घातल्यानंतर नरोत्तम यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे धाव घेतली. हा सर्व प्रकार पाहून सिद्धारामय्या यांनी गाडी थांबवली आणि नरोत्तम यांची समस्या सोडवण्याचे आदेश दिले. 

वृद्ध व्यक्तीची तक्रार काय?मुख्यमंत्र्यांशी वाद घालणाऱ्या वृद्ध व्यक्तीने सांगितले की, ते मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर राहतात आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला इतके लोक येतात की त्यांची गाडी काढताना त्यांना अडचण येते. मागील पाच वर्षांपासून हे होत आहे, त्यामुळे आम्ही वैतागलो असून आता सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर इथे येणाऱ्यांची संख्या आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.    पोलिसांनी सांगितले की, इथे अनेक गाड्या उभ्या केल्या जातात, त्यामुळे शेजारच्या लोकांना त्रास होतो. गाड्या गेटपासून थोड्या लांब अंतरावर का लावल्या जात नाहीत, अशीही लोकांची तक्रार असते, पण आमची अडचण अशी आहे की मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या मंत्र्यांची वाहने इथेच उभी करावी लागतात. ते ज्या पदावर आहेत, त्यामुळे आम्हीही काही करू शकत नाही.

टॅग्स :Karnatakकर्नाटकsiddaramaiahसिद्धरामय्याChief Ministerमुख्यमंत्रीTrafficवाहतूक कोंडी