शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार तरूणांना खुशखबर! महिन्याला ३ हजार मिळणार पण शिक्षणाची अट; सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 21:08 IST

वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगार तरुणांची कमतरता नाही.

कर्नाटक सरकारने राज्यातील बेरोजगार तरूणांना खुशखबर दिली आहे. देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असला तरी भारतातील बेरोजगारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगार तरुणांची कमतरता नाही. हातात मोठ्या पदव्या असूनही अनेक राज्यांमध्ये तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. अशा तरूणांना दिलासा देण्यासाठी किंवा आर्थिक मदत म्हणून कर्नाटक सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बेरोजगारांच्या मदतीसाठी कर्नाटक सरकारने एक योजना सुरू केली आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 'युवा निधी' योजनेचा शुभारंभ केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहा लाभार्थ्यांना धनादेश सुपूर्द करून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेची विशेष बाब म्हणजे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले आणि शिक्षण पूर्ण होऊन १८० दिवस उलटूनही बेरोजगार असलेल्या पदवीधारकांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

कर्नाटक सरकारची घोषणा दरम्यान, दोन वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि लाभार्थ्याला नोकरी मिळाल्यानंतर लाभ घेता येणार नाही. खरं तर ज्यांनी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केली आहे ते या योजनेसाठी पात्र नसतील. राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी २५० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी राज्याच्या तिजोरीवर १,२०० कोटी आणि २०२६ पासून वार्षिक १,५०० कोटी खर्च होण्याची अपेक्षा आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आधीच चार मोठी आश्वासने दिली आहेत.  काँग्रेस सरकारची 'गॅरंटी'सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील कर्नाटक सरकारने चार बाबींवर लक्ष केंद्रीत केले आहे. कर्नाटक सरकार 'शक्ती' हमी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना लक्झरी नसलेल्या सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देत आहे. 'अण्णा भाग्य' हमी अंतर्गत गरीब कुटुंबांना १० किलो तांदूळ देण्यात येत आहे. त्याचबरोबर २०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे 'गृह ज्योती' हमी योजनेचे उद्दिष्ट आहे. तसेच एपीएल/बीपीएल शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा २ हजार रूपये दिले जातात. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकjobनोकरीUnemploymentबेरोजगारीsiddaramaiahसिद्धारामय्या