शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करण्यास बंदी; कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 17:38 IST

कर्नाटक सरकारने बुधवारी राज्यभरातील हुक्का बारवर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले.

नवी दिल्ली: सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने बुधवारी मोठा निर्णय घेत सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनावर बंदी घालण्याची घोषणा केली. तसेच या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आकारण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने २१ फेब्रुवारी रोजी विधानसभेत COTPA कायद्यात (सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने) सुधारणा करून राज्यभरातील सर्व हुक्का बारवर बंदी घातली आहे. 

याशिवाय २१ वर्षांखालील तरुणांना सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विकता येणार नाहीत, असा नियम लागू करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने बुधवारी राज्यभरातील हुक्का बारवर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक ते तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अधिसूचनेनुसार, राज्यातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि तंबाखूजन्य आजारांना आळा घालण्यासाठी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यात (COTPA) सुधारणा केल्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूचे सेवन करण्यास बंदी दरम्यान, तरूणाई व्यसनाच्या विळख्यात अडकू नये यासाठी २१ वर्षांखालील व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. सुधारित विधेयकात सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, धूम्रपानमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या वचनबद्धतेवर सरकारने भर दिला आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यास १ हजार रुपयांच्या दंडाचा समावेश आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकsiddaramaiahसिद्धारामय्याcongressकाँग्रेस