शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly election 2018; सिद्धरामय्यांना पराभूत करणारे जायंट किलर जी. टी देवेगौडा आहेत तरी कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 12:02 IST

जी. टी. देवेगौडा हे सिद्धरामय्या यांचे एकेकाळचे सहकारीच होते. मात्र सिद्धरामय्या यांना चामुंडेश्वरी मतदारसंघात पराभूत करण्यात त्यांना यश आले हे.

बेंगळुरू- कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे सिद्ध होतो आहे. कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री सिद्घरामय्या यांनी चामुंडेश्वरी आणि बदामी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या परंपरागत चामुंडेश्वरी मतदारसंघातच जी. टी. देवेगौडा यांच्याकडून ते पराभतूत झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देवेगौडा यांना 57 हजार 322 मते मिळाली असून सिद्धरामय्या यांना  35,056 मते मिळालेली आहेत. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच जी. टी. देवेगौडा यांनी मतांमध्ये आघाडी घेतल्याचे दिसत होते. अखेर सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरी मतदारसंघातून पराभव झाला. जी.टी. देवेगौडा हे वक्कलिग समाजाचे नेते असून ते माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र कुमारस्वामी यांच्या जवळचे आहेत. त्यांनी जनता दल सेक्युलर पक्षाच्या तिकिटावर हुन्सुर आणि चामुंडेश्वरी मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. एकेकाळी जी. टी. देवेगौडा सिद्धरामय्या यांच्या जवळचे मानले जात असत. गेल्या दहा वर्षांमध्ये सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्वरी मतदारसंघाला वाऱ्यावर सोडले, त्यांनी कोणत्याही प्रकारे या मतदारसंघाची काळजी घेतली नाही अशी शब्दांमध्ये देवेगौडा यांनी सिद्धरामय्या यांच्यावर प्रचारादरम्यान टीका केली होती.  कदाचित केवळ एकाच मतदारसंघात निवडणूक लढवणे धोक्याचे ठरू शकते हे याची सिद्धरामय्या यांना आधीच कल्पना आली असावी म्हणून त्यांनी दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असावा. चामुंडेश्वरी विधानसभा मतदारसंघात २००६ साली झालेल्या पोटनिवडणूकीत सिद्धरामय्या यांच्याबाजूने व्ही. श्रीनिवास प्रसाद आणि एच. विश्वनाथ मदतीसाठी होते. मात्र  श्रीनिवास प्रसाद भाजपात गेले आहेत तर विश्वनाथ यांनी जनता दल धर्मनिरपेक्षमध्ये प्रवेश केला.  हे महत्त्वाचे वरिष्ठ मित्र इतर पक्षांमध्ये गेले असले तरी नंजनगुंड आणि गुंडलुपेट येथे झालेल्या पोटनिवडणुका सिद्धरामय्या यांनी स्वतःच्या करिष्म्यावर काँग्रेसला निवडून दिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे चामुंडेश्वरीत ते पुन्हा एकदा जिंकतील असा काँग्रेसला विश्वास होता. तो विश्वास सत्यात उतरला नाही.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)G T Devegowdaजी. टी देवेगौडा