शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

Karnataka Election 2018: माझ्या मुलानेच माझी प्रतिमा खराब केली- एच. डी. देवैगोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 14:47 IST

अनेकवेळा एकमेकांशी मैत्री करणारे, शत्रूत्त्व पत्करणारे कर्नाटकातले नेते आणि राजकीय पक्ष आता भूतकाळातील घटनांबद्दल हिशेब मांडत आहेत.

बेंगळुरु- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असताना राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. अनेकवेळा एकमेकांशी मैत्री करणारे, शत्रूत्त्व पत्करणारे कर्नाटकातले नेते आणि राजकीय पक्ष आता भूतकाळातील घटनांबद्दल हिशेब मांडत आहेत. माजी पंतप्रधान देवेगौडा ज्या भाजपाला जातीयवादी ठरवायचे त्याच भाजपाबरोबर 20 महिने कर्नाटकात सत्तेत राहिल्यावर आता त्या निर्णयाबद्दल ते आता बाजू मांडत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी माझा मुलगा (कुमारस्वामी) याने भाजपाबरोबर जाऊन माझी प्रतिमा मलिन केली असे विधान देवेगौडा यांनी केले आहे.तुमचे सर्वात मोठे शत्रू कोण भाजपा की काँग्रेस ? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, ''दोन्ही माझे शत्रूपक्षच. दोघेही मला नष्ट करण्याची इच्छा बाळगतात. काँग्रेसने सिद्धरामय्या यांना माझ्याकडून का हिसकावले गेले?  त्यांनी माझ्याकडून एमपी प्रकाशला का पळवले?  काँग्रेसने या लोकांना पळवल्यामुळे माझा मुलगा कुमारस्वामीला भाजपाकडे जावे लागले. त्यामुळे माझी प्रतिमा मलीन झाली. यामध्ये सर्वात त्रास देवगौडा आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष पक्षाला झाला. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवण्याचं धाडस काँग्रेसकडे येतंच कोठून? चंद्रशेखर यांना पंतप्रधानपदावरुन का बाजूला केलं? चरणसिंह यांना पंतप्रधापदावर का बसवलं गेलं? हे सगळं काँग्रेसनं का केलं? 1996 साली पंतप्रधान असताना मी गुजरातमधील भाजपाचं सरकार हटवलं होतं. ते माझ्यासमोर काय बोलणार? सहा वर्षे अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर सत्तेत असणाऱ्या द्रमुकच्या एम. करुणानिधी दारात काँग्रेसवाले गेले. राजीव गांधी यांची हत्य़ा झाली तेव्हा ते (करुणानिधी) मुख्यमंत्री होते, हे सगळं संधीसाधू राजकारण नाही का?''2019ची निवडणूक लढवणार नाही...2019 साली आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगताना एच. डी. देवेगौडा म्हणाले,'' मी पुढील वर्षी निवडणूक लढवायचे नसल्याचे ठरवले आहे. काँग्रेस आणि भाजपा नसलेली आघाडी तयार करणे अत्यंत अवघड आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. मी आता एक ज्येष्ठ म्हणून सल्ला देईन पण कोणतीही सक्रीय भूमिका घेणं मला शक्य नाही. माझी तब्येत चांगली नाही आणि जर पूर्ण न्याय देता येत नसेल तोपर्यंत मला कोणतंही पद नको आहे ."

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)