शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे...; कर्नाटकमधील निम्म्यापेक्षा अधिक मतदार पाण्याला महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 08:20 IST

उत्तर आणि पूर्व कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी, बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ जिल्ह्यांतील खेड्यांत मेमधील रणरणत्या उन्हात डोक्या-कडेवर हंडे-कळशा घेतलेल्या बाया-बापड्या दिसतात.

श्रीनिवास नागेबागलकोट (कर्नाटक) : ‘यारेss बरली, नमगे नीरू सिगली’ अर्थात ‘कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे...’ डोक्यावर आणि कडेवर पाण्याचे हंडे घेऊन जाणारी कावेरी सांगते, तेव्हा कर्नाटकातील पाणीटंचाईची भीषणता जाणवते. रोजगार, नोकरीची मागणीही तरुण करताना दिसतात. 

उत्तर आणि पूर्व कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी, बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ जिल्ह्यांतील खेड्यांत मेमधील रणरणत्या उन्हात डोक्या-कडेवर हंडे-कळशा घेतलेल्या बाया-बापड्या दिसतात. रायचूर जिल्ह्यातल्या देवदुर्गजवळ असा घोळका दिसला. त्यातील १९ वर्षांची कावेरी राजकीय पक्षांबद्दलची अनास्था आणि पाण्याची आस दाखवत म्हणाली, ‘निवडून कुणीही येऊ दे, पण आम्हाला पाणी मिळू दे!’

साड्या, धोती-पंचांचा खप तिपटीवरनिवडणूक ऐन भरात असताना साड्या आणि धोती-पंचे, पांढऱ्या शर्टांचा खप तिपटीवर गेला आहे. काही जागी मोबाइलचा खपही वाढला आहे. सर्वच पक्षांकडून वाटप सुरू आहे. म्हैसूर सिल्क, इरकल अशा महागड्या साड्यांनाही मागणी असल्याचे बागलकोटमधील विक्रेते रमेश मुद्देकर यांनी सांगितले.

पूर्व भागही तहानलेलाविजयपूर-निपाणी, विजयपूर-कलबुर्गी या नव्या हायवेवरून आत गेले की हेच चित्र. अलमट्टी धरण असलेला विजयपूर जिल्हा निम्मा तहानलेला. कर्नाटकचा पूर्वभाग खडकाळ. येथील पाणी जड. चूळ भरायलाही तोंडात धरवत नाही. मतदारांना निवडून येणाऱ्यांकडून एकच अपेक्षा, पाण्याची

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक